म्हसळा येथे एक हात सामाजिक मदतीचा


म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

कोरोना रोगाच्या राष्ट्रीय आपत्तीच्या संकटावर मात करण्यासाठी सर्व स्तरातून सरकारला मदतीचा हात मिळत असून प्रत्येक नागरिक आपापल्यापरीने शक्य होईल ती मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. आज संपूर्ण भारतासह प्रत्येक राज्याच्या, जिल्ह्याच्या सीमा सील केल्या आहेत. मात्र नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि कायदा व प्रशासन सुव्यवस्थीत चालवण्यासाठी तसेच या कामात मदत करणारे, कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची सोय व्हावी यासाठी सर्व स्तरातून पोलीस, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, माहितीची देवाणघेवाण करणारे पत्रकार, पोलीस मित्र, कोरोना नियंत्रण कमिटी कर्मचारी यांच्या मदतीसाठी अनेक संस्था पुढे येऊन माणुसकीचे दर्शन घडवीत आहेत. 

म्हसळा शहरातील पोलीस चौक्यांवर दिवस रात्र काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बँक ऑफ इंडिया म्हसळा शाखेचे मॅनेजर श्री.वाकचौरे सर, श्रीदेवी बेकरीचे व्यवस्थापक सुधीर सर, सर्स अक्वा कंपनीचे शिंदे सर यांच्या पुढाकाराने आणि बँक ऑफ इंडिया कर्मचारी यांच्या सहकार्याने पोलीस मित्रांसाठी एक हात मदतीचा म्हणून मास्क, सॅनिटायझर, जेवण आणि पाणी पुरवठा करण्यात आला. यावेळी म्हसळा पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, बँक ऑफ इंडियाचे स्टाफ उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा