दक्षिण रायगडात आणखी एक कोरोनाबाधित


प्रतिनिधी


दक्षिण रायगडात श्रीवर्धनपाठोपाठ आता पोलादपूर तालुक्यातही एका 65 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.तिचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने तिला अधिक उपचारांसाठी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर खबरदारी म्हणून तिच्या मुलगा,सुन,नातू यांचंही अलगीकरण करण्यात आले आहे.

पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथील रहिवासी असलेली ही महिला गेल्या पाच,सहा महिन्यांपासून आपल्या गावीच वास्तव्य करुन होती.मात्र तिचा भांडूप येथे वास्तव्यास असलेला मुलगा,सून,नातू हे 27 ते 28 मार्चच्या दरम्यान उमरठ येथील निवासस्थानी रहावयास आल्यानंतर ही लागण झाल्याचे स्पष्ट झाले.प्राथमिक त्रास जाणवू लागल्याने या महिलेला गावातीलच डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले.पण आजार बळावू लागल्याने तिला तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले.तेथे कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने तिला अधिक उपचारांसाठी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा