श्रीवर्धन नगरपरिषदे तर्फे नागरिकांना आवाहन व विनंती


श्रीवर्धन शहरातील काही नागरिकांचे तपासणी साठी पाठविण्यात आलेले सर्व नमुने अहवाल निगेटिव आले आहेत.....तथापि सर्व नागरिकांना कळकळीची विनंती आहे या घटनेतून बोध घेवुन आपण सर्वांनी स्वत:साठी कुटुंबासाठी आणि शहरासाठी कृपा करुन घरीच थांबावे.... आपल्या शहरात अजून तरी कोरोना दाखल झालेला नाही आणि आपल्याला त्याला अजिबात दाखल होऊ द्यायचा नाही...कोणत्याही परिस्थितीत आपल्याला या संकटावर मात करायचीच आहे....शहरात नगरपरिषदचे अग्निशमन कर्मचारी रोज फवारणी करत आहेत... सफाई कर्मचारी साफसफाई करत आहे कचरा गोळा करत आहेत...बाकी कर्मचारी सर्वे करत आहेत... सरकारी  हॉस्पिटलचे कर्मचारी तपासणी करत फिरत आहेत या सर्वांना या लढाई मधे आपण श्रीवर्धनचे एक सुजाण नागरीक म्हणून घरातच राहुन पूर्ण सहकार्य करावे ही नम्र विनंती......

श्रीवर्धन नगरपरिषद

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा