तळा(किशोर पितळे)
कोरोना या घातक संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर भारतात लॉकडाउन करण्यात आले आहे. सर्वांना घरातच थांबण्याचे आदेश दिले आहेत.डॉक्टर,नर्सेस, पोलीस व आरोग्य विभाग आणि इतर महत्व पूर्ण यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी,पोलीस पाटील, आशा स्वंयसेविका कोरोना विरुद्धच्या लढाईत काम करत आहेत.तसेच या लढाईत रास्त भाव धान्य दुकानदार सहभागी होऊन आपला जीव धोक्यात घालून इतरांची उपासमार होऊ नये म्हणून अन्न धान्य पुरवण्याचे महत्वाचे काम करीत आहेत. सध्याच्या या भयानक परिस्थितीत सर्वजण आपला जीव वाचविण्यासाठी आपापल्या घरात बसलेले असताना सर्व रास्त भाव दुकानदार आपल्या दुकानात अनेक शिधापत्रिका धारकांच्या संपर्कात येऊन आपला जीव धोक्यात घालून धान्य दुकानदार धान्य वाटप करतात. त्यांच्या सुरक्षेसाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था किट्स,मास्क, हॅन्डग्लोज,सॅनेटाईजर यासारखे साहित्य देण्यात आलेले नाहीत. ते स्वतः आपला जीव धोक्यात घालून विना शस्त्र या भयानक लढाईत प्रामाणिकपणे लढत आहेत. मात्र या साठी धान्य दुकानदार बांधवांचे कौतुक करण्याऐवजी काही जणांकडून सोशल मीडिया वरून धान्य दुकानदार काळा बाजार व साठेबाजी करत असल्याचे अनेक आरोप होताना दिसत आहेत.
रास्तभाव धान्य दुकानाचा व्यवसाय हा काही हंगामी नाही, तर तो पिढ्यानपिढ्या अनेक वर्षांपासून
शासन आणी ग्राहक या मधील माध्यम आहे. हा व्यवसाय नेहमीच शासनाकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या कमिशनवर चालवून दुकानदार स्वतःचे उदरनिर्वाह चालवितो. सध्याची परिस्थिती हि अत्यंत दुर्दैवी, भयंकर अशी आहे.अशा परिस्थितीत दुकानदार धान्य दुकान बंद करून घरीच थांबू इच्छितो, मात्र एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून दुकानदार दुकान चालू ठेवून एक प्रकारे व्यवसाय नव्हे तर सामाजिक कार्य करत आहेत.दुकानदारांना हि संवेदना व माणुसकी आहे, ते सुद्धा सामान्य परिस्थितीतूनच आहेत. एका बाजूला हजारो लोक मृत्युमुखी पडत असताना अशा भयानक परिस्थितीमध्ये काळा बाजार करण्याची साधी कल्पना सुद्धा मनात येऊ शकत नाही. हि काळा बाजार करण्याची वेळ नाही. काहीजण सोशल मीडियावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करीत आहेत याची कुठेतरी खंत वाटत असल्याचे एका दुकानदाराने सांगितले आम्हालाही आई वडील पत्नी मुले व कुटुंब आहेत. आम्ही दुकान उघडण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा घरातील सर्वजण आमच्या आरोग्याबद्दल सतत काळजीत असतात. तुम्ही दुकानावर जाऊ नका असा आग्रह आमची मुले करतात. त्यावेळी आमचे मन सुन्न होते, मात्र पुन्हा आम्ही काळजावर दगड ठेऊन मुलांना बाजूला सारून सामाजिक बांधिलकी जपत आम्ही धान्य पुरवठा करण्यासाठी बाहेर पडतो असेरास्तभाव दुकानदारांने प्रस्तुत प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले काहीजणफक्त खोटीप्रसिद्धीमिळवण्यासाठी खोटे आरोप करून बदनामी करत असल्याचे दिसत आहे.दुकानदारांसाठी काही करता येत नसेल तर करू नका पण निदान खोटे आरोप करणे बंद झाले पाहीजे.दुकानदार आणि शिधापत्रिका धारक यांचे जिव्हाळ्याचे व घरगुती नाते आहेत.दुुुुकानदारांची सर्व वास्तविक परिस्थिती सर्वांनााच ज्ञाात आहे. बदनामी करणारयांनी कोरोनाच्या या घातक लढाईत काहीही न करता केवळ दुुकानदारांसमवेत धान्य वाटप करताना धान्य दुकानात१/२दिवस थांबून पाहावे, तेव्हाच त्यांना या कोरोनाची दहशत काय आहे हे लक्षात येईल. शासन केवळ सोशल डीस्टन्सींगवर भर देताना दिसत आहे.परंतु जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करत असताना रास्तभाव धान्य दुकानदारांस सुरक्षा म्हणुन हँडग्लोज, मास्क आणि सॅनिटाईज यांचाही पुरवठा करावा अशी मागणी नागरिकांकडुन होत आहे.
Post a Comment