शाहिर धाकु दौलत घडशी : भापट गावच्या ईतिहासात कलावंताला मानाचा मुजरा

शब्दांकन जयसिंग बेटकर
महाराष्ट्राची लोककला म्हणून ज्या तमाशा ला ओळखले जाते तो तमाशा फक्त मनोरंजन न राहता समाज प्रबोधन करण्याचे माध्यम म्हणून तमाशा कलावंतांनी नेहमीच अग्रेसर भूमिका घेतली. या काळात तमाशाला म्हणावी तेवढी प्रसिद्धी वलय नसताना देखील .धाकू दौलत धाडशी यांनी हे व्रत स्वीकारले आणि आजन्म जोपासले. कलेच्या सेवेला आपले जीवन वाहिले. पैसा प्रसिद्धी चा हव्यास नसलेले हे वक्तिमत्व म्हणजे आजही कलेच्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या ग्रामीण नवोदित कलाकारासाठी ज्ञानाचे मंदिर आहे.     

                     मेरा नाम जोकर मधील राजकपूर जसा आपले दुःख लपवून लोकांना हसवतो तसेच हे तमाशा कलावंत मान अपमान सहन करून कलेची आणि समाजाची सेवा करत असतात.
तमाशा हा मुळात घाटावरचा कला प्रकार असे म्हणून हिणवत असताना देखील कलेकडे फक्त कला म्हूणन ज्यांनी पहिले कला जगले आणि कोकणाचा लाल तांबड्या मातीमध्ये तमाशा ला चांगले दिवस मान सन्मान मिळवून देण्यात  आमचे खरे कोकणरत्न स्वर्गीय धाकू दौलत घडशी यांचा मोठा वाटा आहे हे कोकणातील सर्व कलावंत मोठ्या मनाने मान्य करतात. 

             आज त्यांना जाऊन ६० वर्ष झाली पण फक्त कोकण नव्हे तर अवघा महाराष्ट्र न विसरता या अवलिया कलावंताला आजही स्मरण करतो. आपला आदर्श मानतो याचा आम्हास निश्चितच अभिमान आहे. 

                 प्रख्यात तमासगिर व ढोलकी पटू आणि सुप्रसिद्ध  साहित्यिक  तमाशातील कलावंत स्वर्गीय धाकु दौलत घडशी  यांच्या ६० व्या स्मृती दिनाचे विनम्र अभिवादन यांचा मृत्यू दिनांक २२, एप्रिल १९५९  रोजी प्रदीर्घ आजाराने एका महान कलावंताची ज्योत मावळली परंतु त्यांच्या पाठीमागे कलेचा वारसा,  व त्यांनी तयार केलेले शिष्य खरोखर इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहावेसे कार्य दिसुन येते त्यांच्या पाठीमागे त्यांचा परिवार व परिसरातील चहाता वर्ग या सर्वांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
                 तुमच्या कार्याची परंपरा गेली ६० वर्षे अविरतपणे तुमचे शिष्यवर्ग चालवत आहेत.  त्यांचा वारसा त्यांचे सुपुत्र श्री  नथुराम धाकु घडशी यांनी आणि गावातील जेष्ठ, वरिष्ठांना घेऊन तमाशा कला अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केले. त्याच बरोबर  परिसरातील ग्रामस्थ मंडळ कोकबल, ताम्हाणे करंबे, रुद्रवट  व इतर गावांना यांना कला शिकवण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. या प्रसंगी घडशी परिवाराच्या वतीने , समस्त ग्रामस्थ मंडळ भापट वतीने , शिष्य वर्गाच्या वतीने आदरांजली

 चौसष्ट कला आणि चौदा विद्या मधील एक महत्वपूर्ण कला "तमाशा"  या कलेला खूप प्रतिसाद म्हसळा तालुक्याच्या कानाकोपऱ्यात मिळत आहे हिच बुवा स्वर्गीय धाकु दौलत घडशी यांना त्रिवार अभिवादन

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा