संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
एसटीची सेवा "गाव तेथे एसटी", "रस्ता तेथे एसटी" या ब्रीदवाक्यानुरूप खेड्यापासून शहरापर्यंत विस्तारलेली आहे. सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. देशभरात लॉक डाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे S.T.सकट सर्वच सेवा बंद पडल्या आहेत.सध्या एसटी महामंडळाच्या सर्व बस गाड्या उभ्या आहेत. एसटी बंद असल्याने सर्व चालक वाहक सुट्टीवरच आहेत तरी सुद्धा श्रीवर्धन आगारातील सर्व प्लॅटफॉर्म, प्रशासकीय कार्यालय चकचकीत आसल्याने सफाई कामगारांचे कौतुक विविध स्तंरातून होत आहे.आमचे प्रतिनिधीनी श्रीवर्धन आगाराला नुकतीच भेट दिली असता लॉक डाऊनमुळे आगारातील ६६ बस गाड्या बंद आहेत, त्यामुळे चालक व वाहक असे एकूण २१५ कर्मचारी घरीच आहेत. श्रीवर्धन आगारातून दररोज ३९६ फेऱ्या श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव,महाड,तळा या तालुक्यातून सुमारे १७१०० किमी प्रवास करून या भागातील प्रवाश्याना सेवा देऊन रोजचे ६ लक्ष २० हजार उत्पन्न मिळत असते. सद्य स्थितीत डेपो मॅनेजर श्री. जुनेद यांच्या सह १०कर्मचारी हजर आहेत. त्यामध्ये अनिल खडके (सफाईगार), अतांत्रिकसहाय्यक संतोष माळी, रविंद्र पडवळ , सुरक्षा रक्षक मयुरेश पाटील,मोसिण खोपटकर, रुपेश भुसाणे,राजेंद्र नार्वेकर,वाहक बाळासाहेब भगत,लिपिक कु.सोनल कोठनाके असा स्टाफ हजर आहे. डेपोचे कामकाज बंद असले तरी सर्व चारही फ्लॅट फॉर्म व आगाराचा अन्य परिसर निर्जंतुक व स्वच्छ आसल्याचे पहाण्यात आले.
"लॉक डाऊन असताना Contract Bus च्या चौकशीसाठी श्रीवर्धन बस स्थानकापासून डेपोत आलो असता .लॉक डाऊनच्या दहाव्या दिवशीही डेपोचा पूर्ण परीसर स्वच्छ होता हे फारच कौतुकाचे आहे, औरंगाबाद येथील एसटी कामगार संघटनेचे प्रमुख मच्छिंद्र बनकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन पोलिसांच्या मार्फत असो किंवा जिल्हा प्रशासनाच्या मार्फत कुठलेही काम करण्याची तयारी एसटीच्या चालकांनी दाखविली आहे ह्याची ही आठवण केली."
दिलीप हेंद्रे, अध्यक्ष , जेष्ठ नागरिक संघटना श्रीवर्धन
"जिल्हयांतील कर्जत, मुरुड, रोहा, माणगाव, महाड, आलिबाग,पेण या अन्य डेपोंच्या तुलनेत श्रीवर्धन आगारातील, मॅकॅनिक, प्रशासकीय कर्मचारी, चालक-वाहक, कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर काम करणारे सफाईगार अशी आमची संघ भावना सकारात्मक आहे त्यामुळे आमचे काम चांगले असते. रायगडमधील स्थानिक चालक- वाहक भरती होणे आवश्यक आहे."
श्री. जुनेद, आगारप्रमुख श्रीवर्धन.
Post a Comment