म्हसळ्यात गावठी दारू विक्री व हातभट्टी चे दोन गुन्हे दाखल



संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
देशात तसेच राज्यात कोरोना विषाणूचा संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासन तसेच राज्य शासनाने १४ एप्रिल पर्यंत लॉक डाऊन ठेवण्यात आला असतानाही म्हसळा तालुक्यातील चिखलप आदीवासी वाडी येथे हातभट्टी रसायन करणे, दारू विक्री करण्याबाबत दोन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली .गु.र.नं.१३ व १४ मध्ये फिर्यादी गणेश महादेव मुंडे ४२६ पो.कॉ. यानी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५(फ)(ई) भा. द.वी.कलम२६९, २७०,१८८,अपत्ती व्यवस्थापन अधीनियम २००५चे कलम ५१ (ब )प्रमाणे व शासनाने १४ एप्रिल पर्यंत लॉक डाऊन ठेवण्यात आला असताना व या बंद कालावधीत संपुर्ण रायगड जिल्ह्यात जिल्हाधिकारी साहेब रायगड यानी बार व परमीट रूम व दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देऊनही आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे सदरचा गुन्ह्याची नोंद करून बाळाराम बाबाजी पवार वय ४७ व रमेश कानू पवार वय४५ याना म्हसळा पोलीसानी अटक केली आहे.अे.पी.आय.धनंजय पोरे यांच्या मार्गदर्शनाने तपास पोलीस नाईक शामराव कराडे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा