तळा( किशोर पितळे/संजय रिकामे)
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेअंतर्गत तातडीची वैदकीय सेवा प्रकल्पामध्ये रुग्णालयात दाखल होण्यापुर्वी आरोग्य सेवा(जीवनदायी)रुग्णवाहिका देण्यात येते त्यामध्ये रस्ते अपघात,जखमी झालेले रुग्ण,सर्व गंभीर आजार, गरोदर महीला, नवजात शिशु संबधातील आजार, गंभीर गरोदर महीला,नैसर्गिक आपत्तीत सापडलेले आणि मानवी जोखीमेमुळे झालेले रुग्ण,गंभीर ह्रदय रोगी रुग्ण,सर्पदंशाचे रूग्ण सर्व अपघात अन्नातुन विषबाधा श्वसनाचे रोग मेंदुचा आजार असलेल्या रुग्णांचा समावेश होतो.
वर्षातील ३६५दिवस आणि चोवीस तास उपलब्ध असलेली सेवा आज तळा तालुक्यात तब्बल सहा महीने बंद असल्याने प्रशासनासाठी ही लाजीरवाणी गोष्ट असुन प्रशासनाचे याबाबतीत अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. ही अत्यावश्यक सेवा सुरु तरी कधी होणारअसा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे.राज्य सरकारने रूग्णसेवेसाठी सुरु केलेल्या१०८रुग्णवाहिके वर बीव्हीजी(भारत विकास ग्रुप)या खाजगी कंपनीचे नियंत्रण आहे अनेक कारणांमुळे रुग्णवाहिका दुरुस्ती अभावी उभ्या असतात परंतु तळा तालुक्यातील १०८ रुग्णवाहिका ही गेले आठ महीने बंद असल्याने प्रशासन या रुग्णवाहिकेची दुरुस्ती होणार तरी कधी याची चिंता तळेवासीयांना पडली आहे.आरोग्यसेेवेवर
अनेक गंभीर प्रश्न ऐरणीवर आलेआहेत.त्यापैकी१०८
रूग्णवाहिकेचा असून गर्भवती महीला तसेच नवजात बालके, अपघातग्रस्त रुग्ण वेळेत रुग्णालयात न पोहचल्यामुळे त्यांची परवड सध्या तालुक्यात सुरू आहे.सध्या संपुर्ण देशात कोरोना या महाभयंकर रोगाचा थैमान सुरु आहे अनेक जणांनी आपले जीव गमावले आहेत मृत्युंच्या संख्येत दिवसेंं दिवस वाढ होत आहे अशा प्रसंगी संक्रमीत झालेल्या रुग्णांना या रुग्णवाहीकेने तातडीने मुंबई पनवेलला नेण्यासाठी या जीवनदायीनीचा उपयोग होऊ शकतो ही बाब लक्षात घेता प्रशासनाने अती तातडीने ही रुग्णवाहिका दुरुस्त करुन उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी तळेवासीयांकडुन होत आहे.
Post a Comment