लेप गावात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


म्हसळा -वार्ताहर
मौजे लेप येथे कोरोना व्हायरसचे लॉकडाऊन काळात अडचणीत आलेल्या संपुर्ण लेप गावच्या कुटुंबांना जिवनावश्यक वस्तुंचे लेप ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष,समाजसेवक व्यंकटेश सावंत,रायगड जिल्हा परिषदेच्या माजी प्रतोद वैशाली सावंत आणि सहकारी पदाधिकारी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.लेप गाव तालुका शहरापासुन सुमारे 15 किमी अंतरावर दुर्गम भागात वसलेले आहे येथे येण्याजाण्यास रहदारीचे विशेष साधन नसल्याने समाजसेवक व्यंकटेश सावंत यांनी पुढाकार घेऊन गावातील सर्वच गोरगरीब कुटुंबातील लोकांना लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.अशाच पद्धतीने म्हसळा तालुक्यातील 84 गाववाडीवस्तीतील गोरगरीब निराधार कुटुंबातील सदस्यांना खासदार सुनिल तटकरे,पालकमंत्री नामदार आदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरे यांचे तटकरे मित्रमंडळाचे वतीने जेवणातील गरजेचे साहित्य तालुक्यातील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांचे हस्ते गावागावात जावुन मदतीचा हात म्हणुन वाटप करण्यात येत आहे.या स्तुत्य उपक्रमाचे जनतेतुन समाधान व धन्यवाद व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा