आमदार भरतशेठ गोगावले यांच्या अर्थसाह्यातून पाच पोलिसस्टेशन मध्ये उभारले निर्जंतुकीकरण कक्ष


कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्याकरिता प्रत्येकांनी पुढाकार घ्यावा : आमदार भरतशेठ गोगावले 
महाड  

प्रतिनिधि म्हसळा लाईव्ह 

कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्याकरिता प्रत्येकांनी पुढाकार घ्यावा असे आव्हान महाड विधानसभा मतदारसंघाचे "आमदार भरतशेठ गोगावले" यांनी केले आहे. महाड विधानसभा मतदार संघातील महाड शहर, महाड तालुका, पोलादपूर, महाड एमआयडीसी   गोरेगाव पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ आमदार भरतशेठ गोगावले यांच्या पुढाकाराने  कोरोना निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी करण्यात आली असून यासाठी लागणारे अर्थसाह्य हे आमदार भरतशेठ गोगावले  यांनी उपलब्ध करून दिले आहे. या कोरोना निर्जंतुकीकरण कक्षाचा शुभारंभ आमदार गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते .
या प्रसंगी आमदार भरतशेठ गोगावले , महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पंकज गिरी , संपर्क प्रमुख विजय सावंत, तालुका प्रमुख सुरेश महाडिक,शहर युवा अधिकारी सिद्धेश पाटेकर इत्यादी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना "आमदार भरतशेठ गोगावले" यांनी संपूर्ण देशामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता केंद्र सरकार व राज्य सरकार प्रयत्नशील आहे मात्र पोलीस यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने महाड विधानसभा मतदार संघातील पोलिस ठाण्यासमोरील प्रवेश द्वाराजवळ करुणा निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्याचा निर्णय महाड चे उपविभागीय पोलिस अधिकारी अरविंद पाटील रायगड जिल्हय़ाचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर घेण्यात आला या निर्णयाची अंमलबजावणी सर्वच ठिकाणी करण्यात यावी .या करिता सर्वांचा पुढाकार महत्त्वाचा असून ग्रामपंचायत, नगरपालिका किराणा मालाचे दुकान भाजी मंडई ,सरकारी कार्यालय, गावचे,कारखान्याचे  प्रवेशद्वार या ठिकाणी कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात येताहेत याचा वापर करून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आमदार गोगावले यांनी सांगितले .महाड औद्योगिक वसाहतीं मधील कारखान्यां कडून सी एस आर फंडातून  मधून आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे काम सुरू आहे.कोरोना सारख्या महामारी च्या काळामध्ये महाड उत्पादक संघटना व एमएमए सीईटीपी यांच्या माध्यमातून केले जाणारे सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे आमदार गोगावले यांनी स्पष्ट केले .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा