म्हसळ्यात वाहतुक पोलीसानी केली ४७ वाहने जप्त : पोलीसांचे होत आहे कौतुक.
भविष्यात कडक कारवाईचे संकेत: लॉक डाऊन नंतर होणार वाहनांची सुटका.
भविष्यात कडक कारवाईचे संकेत: लॉक डाऊन नंतर होणार वाहनांची सुटका.
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
देशात तसेच राज्यात कोरोना विषाणूचा संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासन तसेच राज्य शासनाने प्रथम १४ एप्रिल पर्यंत लॉक डाऊन ठेवण्यात आला आता तो १५ एप्रिल ते ३मे असा रहाणार आहे.कोरोना विषाणू (COVID- 19) या रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रातिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये २८/३/२०२० रोजी रात्रौ १२ पासून सर्व प्रकारच्या दुचाकी, तीन चाकी हलकी वाहने, मध्यम वजनाची वाहने, रिक्षा ,टॅक्सी (अत्यावश्यक सेवा वगळून ) याचा वापर करण्यास मा. जिल्हाधिकारी रायगड यानी प्रतिबंध करण्यात आलेला असतानाही , म्हसळ्यातील दुचाकी स्वारांनी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे म्हसळा पोलीसानी आज ४२ दुचाकी व ५ तीनचाकी वाहनांवर कारवाई केली. म्हसळा शहरात पादचाऱ्याना नेहमीच दुचाकीस्वारांचा त्रास होत असल्याने कारवाईचे पादचाऱ्यानी स्वागत केले.
या कारवाईत पोसई दिपक ठूस, पोसई मृदुला शेलार, गणेश भोईर, ट्रॅफीक पोलीस दयानंद सरकटे, घोडके, श्यामराव कराडे, रावजी राठोड, गणेश मुंडे, संदीप फोंडे, धोंडू तात्या सांगळे यांचा सहभाग होता.
"मी प्रथम वडीलांची तब्बेत दाखविण्यासाठी एकदा, नंतर औषधे आणण्यासाठी व मेडीकलचे बील देण्यासाठी दोन वेळा गेलो, कारण योग्य असले तरी मी ते पोलीसाना सांगू शकलो नाही ,माझ्या जवळ लायसन्स नव्हते तर गाडी मित्राची होती पोलिस करत आहेत ते आमच्या व राष्ट्राच्या भल्यासाठी आहे."
दुचाकी स्वार संतोष .

"लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडण्याची सवलत असली तरी नागरिकांनी त्याचा गैरफायदा घेऊन शहरभर भटकू नये, या टोकावरून त्या टोकावर जाऊ नये, त्याऐवजी घराच्या परिसरातच मिळणाऱ्या दुकानांमधून किराणा, भाजी, दूध, औषधी आदी साहित्य घ्यावे."
जयश्री कापरे , नगराध्यक्ष म्हसळा नगरपंचायत.
"कोरोना विषाणू (COVID- 19) या रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये शहरांत सतत येणाऱ्या जाणाऱ्यांवर प्रतिबंध म्हणून पोलीसानी वाहनाची प्रथम धाक , लाठी, नंतर कागदपत्रे, ड्रायव्हिंग परवा- ना या कडे लक्ष देऊन दुचाकी व वाहतुक नियम तोडणाऱ्याना
आर्थिक बुर्दंड दिला परंतु शहरांत दुचाकी स्वारानी अती केल्याने वाहन जप्ती हा पर्याय निवडावा लागला."
धनंजय पोरे स.पो.नी.म्हसळा पोलीस स्टेशन.
Post a Comment