संग्रहित छायाचित्र
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
दक्षिण रायगड मधील माणगाव,महाड, म्हसळा ,पोलादपूर, या तालुक्यात मेघगर्जना, सोसाट्याचा पावसाने व वाऱ्याने विद्युत पुरवठा सायंकाळी खंडीत झाला होता. त्यामुळे लॉक डाऊन मध्ये जन जिवन विस्कळीत झाले होते, याच वेळी म्हसळा तालुक्यात काल सायंकाळी पाचच्या सुमारास, वादळी व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे श्रीवर्धन व म्हसळा या दोनही तालुक्यातील किमान ५० -६० गावांतील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. म्हसळ्या जवळील बनोटी येथे सायं ६. च्या सुमारास H.T. लाईनचा पोल व तारा तुटल्यामुळे म्हसळा तालुक्यातील गोंडघर फीडर पूर्णपणे अंधारात गेल्यामुळे दिघी, बोर्ली, दिवेआगर, वडवली या भागातील बहुतांश गावे तसेच मेंदडी, खरसई, बनोटी या भागातील गावे अंधारात होती, त्याच सुमारासपाष्टी, मांदाटणे ,कोळवट,ताम्हने करंबे, भापट या परीसरांतील अनेक गावातील गावातून अंधारमय वातावरण होते.परंतु कमीत कमी वेळात व कामगारात म.रा.वि.वि.कंपनीचे उप-कार्यकारी अभियंता सतीश वानखेडे यांचे मार्गदर्शनाखाली धीरज बिराजदार, अमोल पालवे, प्रतिक माने हे अभियंता व जेष्ठ वायरमन बाबूराव साळवी, दिनकर शिंदे,प्रकाश साळवी, शैलेंद्र गुलगुले, शैलेश देशपांडे ही मंडळी सतत कामाला लागून सुमारे तीन तासाच्या आत सेवा पूर्ववत केल्यामुळे त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
"काल सोसटयाचे वादळ व वाऱ्यामुळे सायंकाळी सर्वत्र अंधार व गाव वेशीवर कोरोनाचे संकट , त्यात घरात सर्वच मंडळी, करमणुकीचे साधन T.V. बंद, सोशल मिडीयावर रात्र अंधारातच काढावी लागणार अशी चर्चा, त्यातच आम्ही म.रा.वि.वि.कंपनीचे आधीकाऱ्याना फोन लावला तर काम अंतीम टप्प्यांत आहे व लाईट आलाच कोरोनाच्या संकट काळात म.रा.वि.वि.कंपनीचे कर्मचारी हे योध्देच आहेत."
गौरीताई पयेर, मा.जि.प.सदस्य, खरसई
Post a Comment