तळा(किशोर पितळे)
देशात कोरोना रोखण्यासाठी संपूर्ण देशात लाँकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे तळा तालुक्यात लाँकडाऊन काळात राज्यात कुठलाहीनागरिक किंवा व्यक्ती उपाशी राहू नये म्हणून शासन सर्व स्तरावर उपाय योजना केल्या जात आहेत. नोव्हेल कोरोना व्हायरस (कोव्हींड१९) प्रादृर्भा वाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत गोर गरीब मोलमजुरी करणारे, दिव्यांग व्यक्तीसाठी शिवभोजन थाळीसुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने विविध उपाययोजना केल्या जात आहेत.राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अंतर्गत अंत्योदय कार्डधारक २८४८व प्राधान्य कुटुंब लाभार्थी ७०६१ व NPH केसरी १०८८ असे तालुक्यात तालुक्यात३६रेशनिंग दुकाने असून शिधापत्रिका धारक आहेत अंत्योदय योजनेअंतर्गत ३रू.किलो दराने२५किलो तांदूळ व २रू.किलो दराने१०किलो गहू व २०किलो दराने साखर१किलो दिली जाते.व केसरी कार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रती व्यक्ती३किलो गहू प्रती किलो ८रू. प्रमाणे व २किलो तांदूळ प्रती व्यक्ती,प्रती किलो रू.१२प्रमाणे दिले जात आहे. त्याचबरोबर स्तलांंतरीत झालेले परंतु लाँकडाऊनमुळे तालुक्यात असलेल्या शिधापत्रिका धारक जिथे रहात आहेत त्याठिकाणी शासनाच्या पोर्टलिबिटी यंत्रणेप्रमाणे आँनलाईन पध्दतीने अन्न धान्य दिले जात आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती व्यक्ती ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजनासर्व रेशन दुकानात सोशल डिस्टंट ठेवून सुरळीतपणे सुरू आहे.
राज्य सरकारच्या अन्न नागरीपुरवठा विभागाच्या आदेशानुसार सर्व रेशनिंग दुकानात पुरेसा पुरवठा देण्यात आला असून त्याची अंमलबजावणी करण्याचे सुचना दिले आहेत. त्याप्रमाणे सुरळीत वाटप सुरु आहे मोफत धान्य वाटपाचे पैसे दुकानदाराने मागणी केली तर संबंधीत दुकानदाराची तक्रार पुरवठा खात्याकडे केली तर दूकान लायसन्स रद्द केले जाईल.
-परमेश्वर खरोडे, निवासी नायब तहसिलदार तळा.
Post a Comment