गोवंश हत्याप्रकरणी पाभरे येथील दोन युवकाना अटक : आरोपीना चार दिवस पोलीस कस्टडी.


संजय खांबेटे म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यातील पाभरे गावात गोवंश हत्या झाल्याची घटना म्हसळा पोलीसांच्या कानावर पडताच म्हसळा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सपोनी धनंजय पोरे यानी तात्काळ दखल घेत संबंधीत दोन युवकानाअटक केली. याबाबतची फिर्याद पो.हे.कॉ.सुरेश भिवा मोरे यानी दिल्याने म्हसळापो.स्टे. गु.र.नं. ११/२०२० भा.द.वी.४२९,३४, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५,५( B),५ (C) ६, .९(A), प्राण्यास क्रूरतेने वागविल्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११(ठ ) प्रमाणे,महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम ११९ प्रमाणे १)ऱ्हुमान अ.सत्तार तुरुक वय २५, २ ) रबीयान शकील बगदादी वय २२( दोघेही रहाणार पाभरे, मोहल्ला) याना अटक केली आहे. दोनही आरोपीना दि. १३ एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडी भेटली आसल्याचे तपासी अधिकारी सपोनी धनंजय पोरे यानी सांगितले.दोनही आरोपीनी पाभरे गावातील खालच्या मोहल्ल्यातील अ.रऊफ आगे यांच्या पडीक गुरांच्या वाडयांत गोवंश हत्या झाल्याची कुजबुज म्हसळा पोलीस स्टेशनच्या गुुप्त पोलीसांच्या कानी आल्यामुळे सपोनी धनंजय पोरे यानी तात्काळ दखल घेतली व अर्नथ टळला आसल्याची म्हसळ्यात चर्चा आहे व सर्व परिसरांतून म्हसळा पोलिसांचे कौतुक होत आहे.

"गोहत्येचा प्रश्न हा नेहमीच वादग्रस्त ठरत असताना म्हसळा पोलीसानी फिर्यादीची घेतलेली भूमिका कौतुकाची आहे , ग्रामिण भागातून मोठया प्रमाणात गोवंशाची चोरीच्या घटना होत असत, गुन्ह्याच्या या नोंदीमुळे भविष्यात चोरीच्या घटनाना आळा होईल.हिंदू धर्मामध्ये गाईला माता मानले आहे"
महादेव पाटील, तालुका अध्यक्ष हिंदू समाज , म्हसळा.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा