म्हसळा श्री धावीरदेव यात्रेसाठी सोशल डीस्टंसचे भान राखत शाळकरी मुलानी केली मंदीर साफ सफाई


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी

चैत्र महिन्यातील चैत्र शु. चुर्तदशीला म्हसळा शहराची ग्रामदेवता श्री धावीर देव यात्रा भरत असून ग्रामदेवतेचा वार्षिक मोठा उत्सव होत असतो. परंतु कोव्हीड-19 कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यांत C.R.P.C 14 4 लागू असल्याने व म्हसळा हिंदू समाजाचे यात्रेचे स्वरुप अत्यंत मर्यादीत व कायद्याचे चौकटीत ठेवण्याचे निश्चित केले आहे. त्याच पार्श्वभूमीकर चैत्र शु. चुर्तदशीला म्हणजे मंगळवार दिं७ रोजी होणारी श्री धावीर देव यात्रा व बुधवार दि. ८ रोजी होणारी हनुमान जयंतीच्या कार्यक्रमाच्या पूर्व संधेला श्री धावीरदेव मंदीर व श्री हनुमान मंदीराची साफ सफाई हिंदू ग्रामस्थांचे ट्रस्टी वतनदार अध्यक्ष सुभाष करडे यांच्या पैकी ओम, राजेश, प्रथमेश, मयुरेश, सोहम करडे या शाळकरी विद्यार्थ्यानी C.R.P.C 14 4 चे व सोशल डीस्टंसचे भान राखत सामाजिक भावनेने दोनही मंदीरे धुवुन मंदीरांवर श्रीभागवत धर्माचा भगव्या ध्वजाचे रोहण केले .शाळकरी मुलानी उस्फुर्तपणे केलेल्या या कामाचे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे.
फोटो ओम, राजेश, प्रथमेश, मयुरेश, सोहम करडे या शाळकरी मुले मंदीराची . साफसफाई करताना.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा