पायकोळी कुटुंब कलावंतांची खाण...


शब्दांकन : कवी/शाहिर - उमेश धोंडूराम पोटले 

रायगड जिल्हा म्हसळा तालुक्यातील मेंदडी या गावातील सुखवस्तु पायकोळी हे कुटुंब अगदी मनाने श्रीमंत आणि बुद्धिवंत, नटेश्वर आणि रंगदेवतेचे वरदहस्त लाभलेले हे एक ''पायकोळी कुटुंब'' होय.या कलेच्या प्रवाहात गेली अनेक वर्षे आपला वेगळाच ठसा उमटविणाऱ्या या कुटुंबात अनेक कलावंत घडले आहेत व अजून घडत देखील आहेत.काव्य लेखन,गायन, वादन, संगित, नृत्य,क्रीडा अशा विविध कला क्षेत्रात हे कुटुंब पारंगत आहे. जणू पायकोळी कुटुंब स्वर संगीताचे माहेर घर बनले आहे.असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही...! 
"बाळाराम पायकोळी" जीवनात जेव्हा एक खंबीर नेतृत्व.. एक आशावादी मार्गदर्शक व्यक्तिमत्व आपल्यापाठी निर्माण होतं तेव्हा...अजून नावीन्यपूर्ण कार्य करण्याची नवी उमीद निर्माण होते...म्हणूनच कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करणारा कोणी तरी असावा लागतोच तरच ती गोष्ट पूर्णत्वाकडे जाते, त्याच प्रकारचं खंबीर नेतृत्व करत कलेवरती नितांत प्रेम करून "आखाडा" या खेळात वस्ताद होते.पावन्न हात खेळण्यात ते पटाईत होते त्यांच्या संकल्पनेतू "जय बजरंग क्रिडा मंडळाची" स्थापना झाली,आपल्या मुलांना कलेबद्दल ओढ निर्माण करत परिस्थितीला सावरत कुटुंब एकत्र ठेवले म्हणून त्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने आज "पायकोळी कुटुंब" सर्वगुणसंपन्न घडवले आहे.
      ''दुर्वास बाळाराम पायकोळी'' ज्यांच्या लेखणीतील गाणी अवघ्या महाराष्ट्रात घरोघरी झी टिव्ही, कलर्स मराठी वाहिनीवर, सीडी-व्हीसीडी माध्यमातून ऐकली जातात मग ती लोकगीते, कोळीगीते, शक्तीतूरा, विनोदी किस्से अगदी मनाला शब्दा-शब्दात गुरफटून ठेवणारी अशीही दुर्वास दादा यांची सुंदर लेखणी आजहि अजरामर आहे.
      ''विजय बाळाराम पायकोळी''बशक्तीतुरा आणि भजनातील सुप्रसिद्ध ख्यातनाम शाहिर, आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत झी टिव्ही, कलर्स मराठी यांसारख्या वाहिनीवर आपली गाणी सादर केली आहेत,त्यांच्या नावाने शक्ती-तूऱ्यासाठी मुंबईतील नाट्यगृह कित्येक वेळा "हाऊसफुल्ल" गेले आहेत.दुर्वास दादाने लिहिलेल गाणं "गुंडाललेली सोंड अशी करून देवाने लांब कसा उडविला ताटातील मोदक" हे गाणं एवढया ताकदीने गायले आहे की कित्येक वर्षानुवर्षे रसिकांच्या ओठांवर हे रुळत आहे,शक्ती तुऱ्यातून आणि भजनातून त्यांनी अनेक समाजप्रबोधन गाणी आपल्या सुमधुर आवाजात स्वरबद्द केली आहेत.आणि आजवरहि अजून गात आहेत.
    "अनंत बाळाराम पायकोळी" कोणतंही मंगलमय कार्य म्हटलं की आठवतात सनईचे सूर आणि त्या ठेक्याला धरून वाजणारा "ढोल ताशा टिमकी" पारंपरिक वाध्य  ही परंपरा आपल्या कुशल बुद्धीने आज तागायत सुरु ठेवली आहे याला "खालुबाजा" म्हटलं जातं हि कला अनंत बंधु जपत आहेत.
     "रविंद्र पायकोळी" ढोलकीवर थाप पडताच रसिकांचे कान तृप्त होतात, ढोलकीच्या तालावर न नाचणाऱ्याला देखील नाचायला लावतात असे ढोलकीचे बोल त्यांच्या वादनातून निघतात, झी टॉकीज, कलर्स मराठी वाहिनीवरती आपल्या बंधुरायाला साथ दिली आहे, शक्ती तुऱ्यात- भजनात रसिक त्यांची ढोलकी वादन ऐकण्यासाठी आतुर झालेले असतात,शक्ती तुऱ्यातून कित्येक व्हीसीडीत ढोलकीला साथ दिली आहे. अगदी गाव ते मुबंई पर्यंत चे रंगमंच त्यांच्या ढोलकीच्या तालावर मंत्रमुग्ध झाले आहे. "एकच वादा आमचा रवि दादा"बअशा कमेंट्स मिळवणारा आमचा अखंड म्हसळा तालुक्याचा लाडका ढोलकी पटू आणि अष्टपैलू संगीतकार आज सर्वश्रुत आहे.
     "सुनिता बाळाराम पायकोळी" आपल्या बंधुरायांच्या कलेला दाद देत लाडकी बहीण ही या कलेत उतरली आपल्या गोड आवाजाने *शक्ती-तुरा* या क्षेत्रात गायन करून अगदी गाव ते मुबंई पर्यंत रसिक माय प्रेक्षकांची मन जिंकली.
     "प्रशांत विजय पायकोळी" रंगमंचावर नाचता-नाचता वादन कला अवगत केली वडिलांकडे स्वरांचे धडे गिरवत आज बेंजो मास्टर झाले, त्यांनी   बेंजोची तार छेडताच रसिकांच्या हृदयातील तार थिरकते आणि मनाला बेधुंद करून सोडते, झी टॉकीज, कलर्स मराठी या वाहिनीवरती, कित्येक व्हीसीडीला शक्ती तुऱ्यातून वडिलांना संगीताला साथ देत आहेत असे हे कमी वयात आणि कमी वेळेत घडलेले नामवंत-कीर्तीवंत कलावंत आहेत.
     "मिलिंद अनंत पायकोळी" अगदी लहाणापासूनच कलेवरती नितांत प्रेम जडलं रंगभूमीवर वरती नाचता-नाचता आपल्या विजय काकांना ऑर्गनला साथ देत झी टॉकीज, कलर्स मराठी आणि व्हीसीडीला संगीत दिले आहे.शक्ति तुऱ्यातून कित्येक गाण्यांना संगीत देत आहेत अगदी ऑर्गनच वेडच लागले आहे कमी वयात घडलेले हे  एक कलावंत आहेत.
     "उदय विजय पायकोळी" रंगमंचावर नाचता-नाचता वडिलांकडून, काकांकडून, भावांकडून संगीताचे धडे गिरवत ऑक्टोप्याड वादन कला अवगत केली आणि आज शक्ती तुऱ्यातून वडिलांना ऑक्टोप्याड ला साथ देत आहेत कमी वयात घडलेले हे कलावंत आहेत.
     "ऋतिक रवींद्र पायकोळी" रंगमंचावर नाचता-नाचता वडिलांकडून, काकांकडून, भावांकडून संगीताचे धडे गिरवत तबला, मृदुग वादन कला अवगत केली आणि आज शक्ती तुऱ्यातून, भाजनातून साथ देत आहेत कमी वयात घडलेले हे देखील एक कलावंत आहेत.
     "माई दुर्वास पायकोळी" लहानांपासून नृत्य कलेचे वेड मग ते नाच, रेकॉर्ड डांस,ग्यादरींग, नृत्य स्पर्धा, किंवा नाटक असो यात नृत्य अविस्कारात पारंगत, आपल्या कुटुंबाच्या पावलावर पाऊल ठेवत आज गायन कला हि अवगत केली आहे .
      "स्वरांजली बेंजो पथक" पायकोळी कुटूंबातील अजून कितीतरी छोटे मोठे कलाकार मंडळी आहेत त्यांच्या अंगी कलागुणांच वार भरले आहे मग त्यातूनच निर्माण झाले आहे स्वरांजली बेंजो पथक होय.
      "जय बजरंग क्रीडा मंडळ" पायकोळी कुटुंब कलेतच नव्हे तर क्रीडा क्षेत्रात हि अग्रेसर आहे कबड्डी खेळात अनेक वेळा विजेतेपद मिळविले आहे.

"सर्वगुणसंपन्न पायकोळी कुटुंब आहे" याच पायकोळी घराण्याच्या प्रेरणेतून माझ्या अंतरातील कवी जागला आहे. मला या कुटूंबाची साथ वेळोवेळी मिळत आहे ...अशा प्रेरणादायी/आदर्शवत पायकोळी कुटुंबीयांच्या सर्व कलावंतांना कवी/शाहिर उमेश पोटले या एका लहान कलाकाराचा मानाचा मुजरा..!                                  
✍🏻शब्दांकन : कवी/शाहिर - उमेश धोंडूराम पोटले ( मु .चिचोंडे ,ता.म्हसळा, जि. रायगड )
दुरध्वनी ९२२१३५३१७७

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा