"कोरोना गंभीर प्रशासन खंबीर"



म्हसळा करांचे लॉक डाऊनला समर्थन ग्रामिण भागातून सुद्धा होत आहे लॉक डाऊन हे कौतुकाचे.

संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा शहरात किराणा , भाजीपाला, दूध,गर्दी कमी करण्याकरिता महसुल, पोलीस ,म्हसळा नगरपंचायत व व्यापारी असोसिएशनच्या वतीने दि.२२एप्रिल ते ३ मे या कालावधीत बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, शहरात ग्राहकाना दूध मिळत नाही अशा तक्रारी पुढे येताच २३ पासून बाजारात दूध विक्रीस काळी ७ ते ९ या कालावधीत परवानगी दिली व आता बाजारांत सकाळी ९नंतर चिट पाखरू दिसत नसल्याचे चित्र आहे शासन आणि जनता यानी एकत्रित राबविलेला उपक्रम आसल्याने यशस्वी झाल्याची चर्चा शहरात आहे.किराणा, रास्तभाव धान्य दुकान,मेडीकल भाजीपाला, दूध अशा आत्यावश्यक सेवांची विक्री करत असताना व्यापारी व ग्राहक यांचे मध्ये सोशल डिस्टंसचे भान बाळगले आत नसल्याने प्रशासन समन्वय साधत नागरिकांच्या हितासाठी व लॉकडाऊनचा उद्देश सफल होण्याच्या दृष्टीने हा अभिनव उपक्रम राबविला आहे. दूध व भाजी विक्री करताना सोशल डिस्टंस बाबत तक्रारी आल्यास भविष्यात संबधीत व्यापाऱ्यांवर व ग्राहकांवर कारवाई होऊ शकेल.

"शहर व तालुक्यात लॉक डाऊन होण्यासाठी पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागातून तालुक्यातील खरसई १६ एप्रिल ,चिखलप २०एप्रिल ,खारगाव खुर्द १९ ,२३ व २४ एप्रिल, कांदळवाडा,पाभरे,खारगाव बुद्रुक २३ एप्रिल ला लॉक डाऊन ठवण्यात आल्या, म्हसळा शहरातून गाव- खेडयांत आत्यावश्यक सेवा पुरविण्याबाबतच्या चेन मध्ये ग्रामसेवक उत्कृष्ट समन्वयक म्हणून जबाबदारी बजावत आहेत.STAY AT HOME..STAY SAFE..."
धनंजय पोरे, स.पो.नी. म्हसळा पोलीस स्टेशन.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा