म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यातील ठाकरोळी विभागातील सतत विविध उपक्रमशील कार्यात कार्यरत असणारे चिराठी गाव या गावात दरवर्षी सामाजिक, कला, क्रिडा, सांस्कृतिक,धार्मिक, शैक्षणिक, कौशल्य विकसित , जनजागृती असे विविध कार्यक्रम आयोजित करून पूर्ण पणे पार पडले जातात आणि यशस्वी होऊन त्याचा चांगला संदेश ठाकरोळी विभाग कुणबी समाज या विभागात आणि तालुक्यात पोहचत आहे.
आज संपूर्ण देशात आणि राज्यात कोरोनाचे सावट संपूर्ण कानाकोपऱ्यात पोहचत आहे, दिवसेनदिवस कोरोना संसर्ग आजाराबाबत माणसांची संख्या वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत गाव लाॅकडाऊन केली जात आहेत. तालुक्यातील बाजारपेठा बंद आहेत खेडोपाड्यातील लोकांचे जीवनमान विस्कलीत झाले आहे.
अशा परिस्थितीत ग्रामस्थ मंडळ चिराठी (ग्रामीण व मुंबई) कमेटी यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील एकुण ५५ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू साखर, गोडेतेळ, खोबरे,मसाळा,मूग डाळ,आखे मूग, बटाटे,कांदे, बिस्किट पुडे ईत्यादी वस्तूंचे किट चिराठी ग्रामस्थ मंडळाकडून वाटप करण्यात आले. एकुण खर्च ६५ , ०००/- झाले यावेळी ग्रामिण ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री गोविंद नाचरे, सेक्रेटरी श्री लक्ष्मण मांडवकर, मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री सहदेव मांडवकर , सेक्रेटरी श्री सूर्यकांत चव्हाण, उपाध्यक्ष श्री संदेश मोरे, उपसचिव संकेश मोरे , खजिनदार श्री चेतन मोरे, मुंबई संपर्क प्रमुख श्री नितीन मोहिते, सल्लागार श्री विठ्ठल मांडवकर, संतोष मांडवकर, सुनील शेडगे,महेंद्र चव्हाण तसेच ग्रामस्थ व महिला मंडळ, नवयुवक संघटनेचे सर्वच कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment