मुंबईकर ऐकेना...म्हसळ्यामध्ये होम क्वारंटाईनचे शिक्के असणारे मोकाट:पोलिसांनी समज देऊन पाठवले घरी

हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के असताना देखील बाजारात खरेदी साठी गेलेल्या महिला,तरुण व काही मुलींना समज देताना पोलिस दिसत आहेत.

म्हसळा(निकेश कोकचा)
म्हसळा शहरामध्ये होम क्वारंटाईनचे शिक्के असलेले काही जन बाजारपेठ येथे मोकाट फिरताना निदर्शनास आल्याने व्यापार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.या व्यापार्‍यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिल्यावर या सर्वांना बाजारातून बाहेर काढण्यात आले.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई येथून आपल्या मूळ गावी आलेल्या नागरिकांना होम क्वारांटईनचे शिक्के मारून त्यांना चौदा दिवस घरी राहण्याचे सूचना प्रशासना मार्फत करण्यात आले आहेत.मात्र गावात आलेले हे मुंबईकर कोणाचाही ऐकेना अशी स्थिति निर्माण झाली आहे.शुक्रवारी म्हसळा बाजारपेठेत चार ते पाच महिला,मुली व तरुण मुले हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के असताना देखील फिरताना दिसले.यांच्या हातावर शिक्के पाहून व्यापारी वर्गात घबराट निर्माण झाल्याने या व्यापार्‍यांनी पोलिसांना या बाबत माहिती दिली.पोलिसांनी या सर्वांचा एकत्रित शोध घेऊन त्यांना घरीच रहा यापुढे फिरताना दिल्यावर गुन्हा दाखल होईल अशी समज देऊन सोडण्यात आले.म्हसळा तालुक्यात मुंबई-पुणे व इतर शहरातून आलेल्या नागरिकांचा सोध घेऊन त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारले जात आहे. होम क्वारंटाईनचे शिक्के असणारे काही नागरिक प्रशासनाच्या सूचनांचा काटेकोर पालन करीत आहेत.तर काही जन या सूचनांची पायमल्ली करून मोकाट उनाडताणा दिसत आहे. होम क्वारंटाईनचे शिक्के असताना देखील मोकाट उनाडणार्‍या काही युवक व महिलांना वेळीच रोखले नाही तर  प्रशासनाच्या अडचणीत भर पडू शकते. 


हातावर होम क्वारंटाईनचे शिक्का असताना देखील बाजारात खरेदीसाठी आलेला तरुण दिसत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा