संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
आपण आत्यावश्यक कामासाठी बाहेर पडता का? विनाकारण फिरत असाल तर कुटुंब आणि शहराला धोक्यात आणत आहात, असा सल्ला विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना म्हसळा नगरपंचायतीने शहरातील पाभरे फाटा, नगरपंचायत चौक व दिघी नाका या तीन चौकातून चक्क रस्त्यावर संदेश लिहून जनजागृती केली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा जयश्री कापरे व सर्व नगरसेवक, कर्मचारी यांनी विविध उपक्रम राबवित नागरिकांना जागृत केले. श्रीमती कापरे यांच्या कल्पनेतून अनेक उपाय योजना राबविण्यात आल्या. शहरातील स्वच्छतेवर भर देताना सर्वप्रथम सार्वजनिक ठिकाणचा परिसर, ग्रामिण रुग्णालय बस स्थानक, मुख्य रस्ते, शासकीय कार्यालय परिसराचे फवारणी द्वारे निर्जंतुकीकरण केले. सर्व कार्यायलय व पोलीस तपासणी केंद्रासमोर समोर नागरिक कर्मचाऱ्याना सतत हात धुण्यासाठी पाणी व बेसीन ची उपलब्धता केली आत्यावश्यक सेवा म्हणून कीराणा व दूध विक्री केंद्रासमोर ग्राहकानी सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी चौकोन आखून दिशा देण्याचा प्रयत्न केला, शहरातील ग्राहकाना भाजीपाला व फळे घरी मिळावी म्हणून प्रत्येक विभागातून विक्रेत्यांचे व नगरसेवकांच्या समन्वयातून भाजी विक्री केंद्राची स्थापना केली वारंवार आवाहन करूनही सुरक्षित अंतर ठेवण्यात आणि गर्दी कमी करण्यात नागरिक पुढाकार घेत नसल्याने रस्त्यावर वाहनांची रहदारी कमी झाली नाही.
परिणामी रायगड जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण क्षेत्रात दि. २९ मार्चपासून अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त वाहनांना बंदी करण्यात आली. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्यांना यातून मुभा आहे. तर अति महत्त्वाच्या कामासाठी नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने पास दिले या सर्वावर म्हसळा शहरांत पोलीसानी कारवाई करुनही बाजारांत वाहनांची वर्दळ , मेडीकल,किराणा, दूध व भाजीपाला खरेदीच्या नावाखाली प्रचंड वाढल्याने तसेच सोशल डीस्टंसचा नियम व्यापारी व ग्राहक तोडू लागले यावर महसूल, पोलीस व नगरपंचायत प्रशासनान म्हसळा यानी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनी.दि.४ एप्रिल ते सोमवार दि.६ एप्रिल पर्यंत तीन दिवस संचार बंदी जाहीर केली आहे. असे विविध उपाय योजना महसुल,पोलीस,आरोग्य,नगरपंचायत प्रशासनाने
प्रयत्न केले.आता जनजागृतीची उपाय योजना म्हणून रस्त्यावर घोषवाक्य लिहीली भविष्यात बॅनरसुध्दा लावता येतील किंवा याही पेक्षा कठोर नियम करण्यात येतील असे सांगण्यात आले.
Post a Comment