तळा(किशोर पितळे)
जगभरात कोरोना विषाणूजन्य संसर्ग रोगाने थैमान घातले असून संपूर्ण देशात पंतप्रधानमा.नरेंद्र मोदी,राज्याचे मुख्यमंत्रीमा. उध्दवजी
ठाकरे या रोगाचे संक्रमण रोखण्यासाठी वारंवार सुचना
व आदेश दिले असून संपूर्ण देशात लाँक डाऊन करुन
संचारबंदी लादली आहे. जिल्हा प्रशासनाचे महसूल, पोलीसप्रशासन माध्यमातून प्रत्येकगावग्रामपंचायतीना स्वच्छता मोहीम,जंतूनाशक फवारणी करावी असे आदेश दिल्याने तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीने जंतुनाशक औषधांची फवारणी केली असून कोरोना सारख्या जीवघेण्या रोगाची जनजागृती मोहीम राबवून युद्धपातळीवरअहोरात्र मेहनतघेतआहेत सर्वग्रामसेवक ,शिपाई, लेखनीक, सफाई कामगार आशा स्वंयसेविका,
अंगणवाडी सेविका,आरोग्य सेवक सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील,गावअध्यक्ष तंटामुक्तअध्यक्ष,स्वंयसेवक ,ग्रामस्थ मदतनीस सहभागी झालेआहेत.असे चित्र दिसतआहे.यापुर्वी प्रशासनाकडून वर्षभराची विविध विभागाची उद्धिष्ट साध्य करत मार्च अखेर होणाऱ्या सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयातीलकर्मचारी, व ग्रामसेवकांसाठी यंदाचे मार्चअखेर परीक्षा घेणारे ठरलेआहे.जानेवारी, फेब्रुवारी च्या दरम्यान जगात हाहाःकार माजविलेल्या कोरोना विषाणूचे संकट संपूर्णभारतसह शहर ग्रामिण भागापर्यत आले आहे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, लक्षण, उपाय योजना या बाबत सर्वत्र पसरलेले समज गैरसमज यासाऱ्या गोष्टींना योग्य समय सूचकता दाखवत योग्य उपाय योजनेसह सामोरे जाण्याचा तो काळ असून ग्रामिण भागासाठी निश्चितच कठीण असून लॉकडाऊन, संचारबंदी, कलम १४४,आपत्ती व्यवस्थापन कायदा आदी मुळे नागरिक भयभीत झाले होते,अशा वेळी प्रशासनाच्या सुचना, व आदेश वरिष्ठांचे मार्गदर्शन, पदाधिकारी यांची संयमी साथ व स्वतःतील कसब पणाला लावून ग्रामसेवकांनी कोरोना विरुद्धचे या युद्धात स्वतःला सिद्ध केलेआहे.परदेशातून आलेले नागरिक राज्या बाहेरून आलेले नागरिक, राज्यातून आलेले नागरिक यांची नोंद घेणे त्यांची प्राथमिक तपासणी करणे, लक्षण असलेल्याना होम क्वारंटाईन करणे, क्वारंटाईन करणे, नियंत्रण कक्षाची स्थापना करणे, धुर फवारणी, निर्जंतुकीकरण, परिसर स्वच्छता, कोरोना प्रतिबंधात्मक जनजागृती, सॅनिटायझर व मास्क वाटप, नागरिकांना दैनंदिन वस्तू गावातच उपलब्ध करून देणे, त्यासाठी सामाजिक अंतर राखून ठेवणे, तसेच परराज्यातील मजूर व गावातीलनिराधार, गरजू गरीब कुटुंबासाठी निवास,जेवण, शौचालय,पाणी आदी सुविधा निर्माण करणे या सर्वच आघाड्यावर ग्रामसेवक कर्तव्य बजावत असल्याचे ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष उमाजी माडेकर यांनी प्रस्तुत प्रतीनिधींना दिली.कोरोना प्रतिबंधाच्या या कामाला स्वतःचा जीव धोक्यात घालून कृतिशील पाठबळ देत पुढे आलेले आजी,माजी पं.स.सभापती, सदस्य, जि.प. सदस्य, सरपंच, उपसरपंच, निवडक ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायतींचे कर्मचारी, सफाई कर्मचारी यांना घेऊन नागरिकांची घेतलेली काळजी,त्यांना दिलेला धीर आधार हे सारं कौतुकास्पद आहे.या सर्व कामात ग्रामसेवकांंनी पुढाकार घेवून निर्धारपूर्वक व जबाबदारीने केलेले काम दिसत असून निश्चित प्रशंसनीय आहे. दिलेले योगदान इतिहासात नोंद होईल असे कर्तव्य बजावले आहे.
Post a Comment