म्हसळाकरानो शासनाच्या सूचनांची खबरदारी घ्या आम्ही आपली जबाबदारी घेऊ. ; म्हसळा तालुका डॉक्टर असोसीएशन शासनाच्या आरोग्य यंत्रणे समवेत सज्ज.
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर म्हसळा तालुक्यात राज्य शासनाचा आरोग्य व्यवस्थेतील ग्रामिण रुग्णालय, जिल्हा परिषदेच्या आरोग्य व्यवस्थेतील म्हसळा, मेंदडी व खामगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ,पाभरे येथील १ जि.प. दवाखाना सक्रीय होऊन कार्यरत असतानाच तालुक्यातील खाजगी वैद्यकीय संघटनेनी शासनाचे आरोग्य यंत्रणे समवेत काम करण्याचे जाहीर केले आहे.शासनाला त्याबाबत कळविले आसल्याचे संघटनेचे अध्यक्ष डॉ.अब्दुल मुईज शेख यानी सांगितले.म्हसळा शहरात नोडल ऑफीसर म्हणून मुख्याधिकारी म्हसळा नगरपंचायत,तालुक्यांतील ग्रामिण भागात नोडल ऑफीसर म्हणून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाय.एन.प्रभे काम करीत आहेत.ग्रामिण रुग्णालय म्हसळाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.महेश मेहता व ता.आरोग्य . अधिकारी डॉ.गणेश कांबळे यानी म्हसळा तालुक्यात अद्याप पर्यंत कोरोनाचा एकही संशयीत रुग्ण नसल्याचे सांगितले. भविष्यांत कोरोनाची लागण होऊ नये व नियंत्रण रहाण्यासाठी कोरोना विषाणू (COVID-19) या रोगाची सर्वसामान्य लक्षणे दिसत आसल्यास ( ताप,सर्दी,खोकला,घसा दुखणे व श्वास घेण्यास त्रास इ.) रुग्णाला नजीकच्या शासकीय रुग्णालयांत तपासणीसाठी पाठविण्या बाबत बंधनकारक आसल्याचे पत्र तालुक्यातील खाजगी वैद्यकीय व्यवसायीकाना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश कांबळे यानी दिले आहे.म्हसळा शहरात खाजगी वैद्यकीय व्यवसायीक १४,प्रा.आ. केंद्र मेंदडी ७ व खामगाव ६ आहेत.
कोरोना विषाणू (COVID-19) या रोगाबाबत म्हसळयात आरोग्य यंत्रणा सज्ज.
भविष्यांत कोरोनाची लागण होऊ नये व नियंत्रण रहाण्यासाठी कोरोना विषाणू (COVID-19) या रोगाची सर्वसामान्य लक्षणे दिसत आसल्यास ताप,सर्दी,खोकला,घसा दुखणे व श्वास घेण्यास त्रास इ. होऊ लागल्यासCOVID-19 साठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी म्हसळा शहरातील ग्रामिण रुग्णालय व तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आरोग्य व्यवस्थेतील म्हसळा, मेंदडी व खामगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सज्ज ठेवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यायलाने कळविले आहे.
"भविष्यांत म्हसळ्यात कोरोनाची लागण होऊ नये अशी आमची प्रार्थना आहे व नियंत्रण रहाण्यासाठी कोरोना विषाणू (COVID-19) या रोगाची सर्वसामान्य लक्षणे दिसल्यास आम्ही तालुक्यातील सर्व खाजगी वैद्यकीय व्यवसायीक शासकीय आरोग्य यंत्रणे सोबत राहू"
डॉ. अब्दुल मोईज शेख, अध्यक्ष, म्हसळा तालुका
फोटो : म्हसळा शहरात खाजगी वैद्यकीय व्यवसायीकानी रुग्णाना मार्गदर्शन करण्याबाबत लावलेले बोर्ड.
Post a Comment