छाया संग्रहीत
तळा(किशोर पितळे)
तळा तालुका डोंगराळ दुर्गम भागात वसलेला असून तालुका निर्मितीला २१वर्षाचा
काळ लोटला आहे.तालुक्यात एक प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगांव, रोवळा,भानंग,पिटसई,मांदाड ही पाच उप केंद्रे व नव्याने महागांव प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर असून त्या ठिकाणी१५जागा ची मंजुरी असूनही आजपर्यंत जागा भरलेल्या नाहीत. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय ३जागा रिक्त पैकी आरोग्य अधिकारी अतिरिक्त पदभार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय१८पदे, रिक्त शालेय आरोग्य २पदे रिक्त, उपकेंद्र निहाय१२पदे रिक्त असून फक्त तळेगांव उपकेंद्रात १आरोग्य सेविका कार्यरत आहे.शासनाने कोट्यावधी रू.निधी खर्च करून इमारती बांधल्या पण रिक्त जागा भरल्या नाहीत. तसेच तळा येथे देखील रिक्त पदे आहेत.एकच वैद्यकीय अधिकारी असून ६५गावाला सेवा कशी देणार?सद्या कोरोना सारख्या महाभयंकर रोगावर नियंत्रण मिळवणे जिकरीचे झाले आहे.सुदैवाने सद्यस्थितीत कोरोनाग्रस्त आढळून आला नाही.परंतु शक्यता नाकारता येत नाही परीस्थिती उद्भवल्यावर आरोग्य प्रशासन हालचाल करणार का?असा संतप्त सवाल जनतेतून केला जात आहे.याबाबत अनेक वेळा वृत्तपत्राचे माध्यमातून, तालुका समन्वयक समीती,जनता दरबारात लक्षवेधी
मागणी केली त्यावेळी स्थानिक आरोग्य विभाग वेगवेगळी कारणे पुढे करून वेळ मारून नेत आहेत. कोणताही अधिकारी व लोकप्रतिनिधी गंभीर समस्या बाबत गांभीर्याने दखल घेत नाही. अशा अनेक समस्या आरोग्य विभागात असून रायगड प्रेस कल्ब सल्लंग्न
तळा प्रेस क्लबने पुढाकार घेऊन मा.आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य,जिल्हा धिकारी रायगड, पालकमंत्री रायगड,मुख्य कार्यकारी अधिकारीरायगड,तहसीलदार तळा यांच्याकडे लेखी स्वरूपात ई मेल द्वारे मागणी केली आहे.
Post a Comment