राज्यभरात अगस्त्या फाउंडेशनच्या समर कॅम्प उपक्रमातून लाखो मुलांच्या क्रिएटिव्हिटीला चालना



● लॉकडाऊन मध्ये मुले साकारतायेत कोरोना विरुद्ध ची लढाई 

● कोरोनाला हद्दपार करण्यासाठी मुलांची वैविध्यपूर्ण कॅम्पमधून अनोखी रचना 

म्हसळा :श्रीकांत बिरवाडकर

            देशातील संस्कृती अस्मिता आणि एकात्मतेचे संवर्धन व्हावे यासाठी राज्यात अनेक सामाजिक संस्था पुढे येऊन आपली कामगिरी अत्यंत जबाबदारीने स्वीकारून त्याची छाप आजूबाजूच्या परिसरावर पाडत असल्याचे दिसून येत आहेत. अशातच देशावर कोसळलेले भले मोठे संकट हे नोकरी करणाऱ्या ते शाळेतील मुलांच्या शिक्षणाच्या पायरीचा मोठा संकट बनून राहिलेल्या कोविड -१९ या विषाणूजन्य आजारात सर्वच जण घरी लॉक झालेत. यामुळे मुलांना या गोष्टीतून त्यांच्या आकलन शक्तीला कशी चालना देता येईल यावर अनेक उपाय योजना साकारणारी देशभरात गेली वीस वर्षांपासून विज्ञान संकल्पनेची सांगड घालणारी अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था देशातील एकूण एकोणीस राज्यात कार्यरत असून या संस्थेद्वारे सध्या ऑनलाइन डिजिटल समर कॅम्प उपक्रमाचे आयोजन राज्यात ठिकठिकाणच्या जिल्ह्यात सुरू आहे. या उद्देशाने मुलांचे व्यक्तिमत्व विकसित व्हावे, मुलांना एखाद्या गोष्टीची नवचेतना प्राप्त व्हावी, त्यांच्या मध्ये असलेली क्युर्यसिटी व क्रिएटिव्हिटी जागृत व्हावी, सुट्टीतील आणि घरी अडकून पडलेल्या मुलांच्या  मोकळ्या वेळेत त्यांच्याकडून नवीन विज्ञान संकल्पनेवर आधारित एखादि झेप घेण्याची क्षमता निर्माण व्हावी या उद्देशाने त्यांच्यासोबत हे समर कॅम्प उपक्रम आयोजन करण्याचा मुख्य हेतू या संस्थेचा असल्याने राज्यातील रायगड, मुंबई, पुणे ,नाशिक, धुळे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, अमरावती, सोलापूर, सातारा अशा जिल्ह्यातून या संस्थेद्वारे अगस्त्या पायलट हे ऑनलाइन समर कॅम्प मुलांपर्यंत पोहचवून या उपक्रमातून विज्ञानाची सांगड घालताना दिसून येत आहेत. यामध्ये कॅम्प मधील प्रत्येक मुलाला नाविन्यपूर्ण खेळातून नवीन पद्धतीवर काही वेगवेगळ्या संकल्पनेवर कलाकृती करण्याचे पुढाकार दिला जात आहे. यातून मुलांच्या अंगी असलेली जिद्द आणि चिकाटी दिसून येते यामध्ये बहुतांश मुलांना क्युरिओसीटी कार्णीवल या नाविन्यपूर्ण डिझाइन थिंकिंग वर आधारीत असलेल्या उपक्रमाची जास्त आवड निर्माण होऊन यामध्ये घेण्यात आलेल्या उपक्रमातून मुले स्वतःला काहीतरी अजमवण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामध्ये मुले घरबसल्या घरातील टाकाऊ गोष्टींचा वापर करून Feel, imagination, choose, Try, Do, and show asha सायकलचा वापर करून या प्रतिकृती पूर्ण करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा