महावितरणाचे पितळ अवकाळी पावसाने केले उघड;संपूर्ण तालुका अंधारात,नागरिक हैराण.



तळा (किशोर पितळे)
बुधवारी अवकाळी पावसाच्या सरी येण्यास सुरुवात होताच लोक काहीसे सुखावले होते. पण महावितरणने ते काही मिनिटांतच हिरावून घेतले.तळा शहर आणि ग्रामीण भागात सलग सोळा तास वीजपुरवठा खंडीत होता.रात्री आठ वाजेपासून विजेचा लपंडाव सुरू झाला.तो गुरुवारी दुपारी एक वाजेपर्यंत कायम होता.लाखो ग्राहकांना रात्र अंधारात काढावी लागली. उकाडा,डासांच्या उपद्रवामुळेझोपेचा चक्काचूर झाला.महावितरणने पावसाळ्यात अखंडित वीजपुरवठा करण्याचे आश्वासन आताच फोल ठरले आहे.गेल्या सहा महीन्यात पासून महा वितरणने ग्राहकांना उत्तम सेवा दिल्याने समाधान व्यक्त केले जात होते.लाँकडाऊनच्या काळात देखील अतीशय चांगल्या प्रकारे कर्मचारी वर्ग अधिकारी यांनी सेवा दिली त्याचा चांगला बोलबाला वाजत असताना काल मात्र अचानक आलेल्या पावसाने हजेरी लावल्याने बत्ती गुल झाली एवढेच नव्हे,तर रात्री सात वाजता गायब झालेल्या विजेचारात्रभरलपंडाव सुरूराहिल्याने नागरिकांनी नावाजलेली नवरी शेंबडी निघाली असा प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे  
     दुपारी एकनंतर लाईट आली परंतु ती डीम होती व पुन्हा अनेक भागांत वीज गायब झाली होती.पहिल्याच पावसाने महावितरणचे पितळ उघडे केले आहे. सुरवातीला फाॅल्ट सापडला नाही नंतर पाबरा लाईन येथे मेजर फाॅल्ट असल्याने रात्रभर लाईट नव्हती असे समजते कर्मचारी आणि अधिकारी यांनी रात्रभर मेहनत घेत लाईन सुरु केली परंतु दुपार पर्यंत देखील डीम लाईट असल्याने नागरिकांची गैरसोय झाली त्यामुळे विजेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पाबरा येथून तळा तालूक्यात येणारी लाईन गेल्या पावसाळ्यात तुटली असुन नवीन पोल बसविण्यात ग्रामस्थांकडून हरकत येत असल्याने वीजेची समस्या निर्माण झाली आहे  तालुक्याला स्वतंत्र वीज पुरवठा मिळाल्या नंतरच शहर आणि ग्रामीण भागात विज पुरवठा सुरळीत होईल असे उप कार्यकारी अभियंता कडून समजले जातआहे.विज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने अनेक भागांत पाणी नाही दरम्यान, बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह हलकासा पाऊस झाल्याने रात्री सात तेदुपारी एक वाजेपर्यंत वीज खंडीत झाली होती.त्यामुळेग्रामीण आणि शहरी भागात पाणीपुरवठा करता आलेला नाही.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा