बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरांचा मृत्यू


म्हसळा(निकेश कोकचा)

म्हसळा तालुक्यात बिबट्यांनी दहशत निर्माण केली असून, गुरवारी पहाटे मौजे कुडतुडी येथे घरा लगतच्या एका गोठ्यातील गाईच्या दोन बछड्यांचा बिबट्यांने फडशा पाडला आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून कोरोंना विषाणूंमुळे कामविणा घरीच असणारे ग्रामस्थ व शेतकरी भयभीत झाले आहेत.
तालुक्यातील देवघर ग्रामपंचायत हद्दीतील कुडतुडी राव वाडी येथील स्वाती संतोष चाळके यांच्या वाड्यात ही घटना घडली आहे. गुरवारी पहाटे 2 ते 4 च्या सुमारास गावलगतच्या जंगलातून बिबट्याने चाळके यांच्या वड्यातील गाईच्या दोन बछड्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारले.बिबट्यांनी बछड्यांवर केलेल्या हल्ल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तत्काल बिबट्याचे बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.सदर घटनेची माहिती मिळाल्या नंतर वन रक्षक सतीश खरात व जी.एस.लालछूटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.यावेळी लवकरच या नुकसानीची भरपाई देण्यात येईल असे वनरक्षक खरात यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा