एचआयव्ही संसर्गितांच्या औषध पुरवठ्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा घेत आहे काळजी

अलिबाग: कोविड-19 या आजाराच्या प्रतिबंधाकरिता महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे  एचआयव्ही संसर्गितांच्या औषधांमध्ये खंड पडू नये, याची खबरदारी म्हणून राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था नवी दिल्ली व महाराष्ट्र एड्स नियंत्रण सोसायटी वडाळा, मुंबई यांच्या आदेशानुसार एआरटी केंद्र, जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग व धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, अलिबाग येथे एचआयव्ही संसर्गित असणाऱ्या व्यक्तीला देण्यात येणारी एआरटी उपचार पद्धती ही जवळील  जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथील  आयसीटीसी केंद्रामध्ये  देण्यात येत आहेत.
          जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रमोद गवई, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री. संजय माने, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग यांच्या नियोजनानुसार व  आधार ट्रस्ट, पनवेल येथील श्री. विजय नायर, साथी संस्था मुंबई निलेश सकपाळ  यांच्या समन्वयाने महाराष्ट्र एड्स नियंत्रण सोसायटी वडाळा, मुंबई यांचेकडून एआरटी औषधे ताब्यात घेणे, ते  जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथील  आयसीटीसी केंद्रामध्ये पोहोच  करणे, वरील आयसीटीसी केंद्रामध्ये येऊ शकत नसलेल्या व्यक्तीला त्यांच्या घरी जाऊन एआरटीची औषधे देऊन बाहेरील जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गित लोकांना सुद्धा एआरटी औषधे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. 
त्यांची नावे व त्या ठिकाणच्या  आयसीटीसी कर्मचाऱ्याचा मोबाइल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत---
          उपजिल्हा रुग्णालय, माणगांव-  रंजिता खेडेकर- ८७९३७९५८८९, आरती राजपूत- ८७९३३१३६७६, उपजिल्हा रुग्णालय,  कर्जत- विजय पवार-  ८३०८३४९६०८, अक्षयकुमार मस्के- ८६०५८८३३७९, उपजिल्हा रुग्णालय, पेण-  मंदा पाटील- ८१४९१५७३१६, अमोल नारखेडे- ९६३७०७१२९३, चैताली कुलकर्णी- ९९२१९७४१७५, उपजिल्हा रुग्णालय, रोहा-महेश गोसावी - ९८८१४९१५६६, मंगेश पाटील- ९०२१४०३८०२, उपजिल्हा रुग्णालय,पनवेल- विकास कोंपले- ७२०८०४१९९९,  रामेश्वर मुळे-  ८६०५८८८८०५, प्रतिभा पाटील- ७७१५८२५१५३,  ग्रामीण रुग्णालय, महाड-  सचिन नवाले-  ९०४९८९२९०७, वासंती पाटील- ७६२०८१३७५२,  ग्रामीण रुग्णालय, उरण-  महादेव पवार- ८६९१८०४८८५, स्मिता काळभोर- ९८७०५५८०२६, ग्रामीण रुग्णालय, कशेळे- आशा बाळशंकर-   ८४५९६७६९५७, स्नेहल दूधसागर- ८१४९०८८९६८, ग्रामीण रुग्णालय,  पोलादपूर- राजेश वसावे-   ८३८०८८६००३, सीता जाधव- ९४०५१८५७२०, ग्रामीण रुग्णालय, चौक- अशोक लोंढे- ८७८८१४४७३२, विकास घुमरे- ९०४९०२७६२७, ग्रामीण रुग्णालय, मुरुड- सचिन जाधव-  ७७६७८५०१३०, समीर धाडूंरे-८००७७५६७८६,  नगरपालिका दवाखाना,खोपोली -भोजराज चौधरी- ९८८१४३३५९७, अमोल इसामे-  ८६०५८५३८७०.
       जिल्ह्यात सध्या ९ हजार २८४ च्या जवळपास एचआयव्ही संसर्गित रुग्ण आहेत. त्यापैकी ६ हजार ८१९ रुग्ण एआरटी उपचार घेत आहेत, त्यांनी त्यांच्या जवळील रुग्णालयातून औषधे घेऊन जाताना सोबत एआरटी कार्ड नेणे गरजेचे आहे.एआरटी उपचार कार्ड नसेल तर pre ART व On ART नंबर असणे गरजेचे आहे,असे  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री. संजय माने, जिल्हा सामान्य रुग्णालय, रायगड यांनी आवाहन केले आहे.          

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा