क्वारंटाईनचे शिक्के असताना घराबाहेर
दिघी सागरी पोलिसांकडून आणखी तिघांवर गुन्हे दाखल, 15 दिवस इन्स्टिट्युशनल क्वारन्टाईन
रविंद्र पेरवे : श्रीवर्धन
संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस विषयी दहशत असताना होम क्वारंटाईनचे शिक्के असताना घराबाहेर उनाडक्या करणाऱ्या आणखी तीन जणांवर गुरुवारी (ता - 2 एप्रिल) रोजी संध्याकाळी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे क्वारंटाईन असणाऱ्या एकूण 6 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
कोरोना व्हायरस च प्रादुर्भाव असलेल्या देशांतून परतणाऱ्या सर्वांना होम क्वारंटाईन चे शिक्के मारण्यात आले आहेत. गुन्हे दाखल झालेलं तिघेजनांपैकी एक जण परदेशातून तर दोघे मुंबई तुन नुकतेच आले होते. डॉक्टरांनी त्यांच्या हातावर अगोदरच क्वारंटाईनचे शिक्के मारले होते.गुरुवारी अचानक दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार व डॉक्टरांच्या पथकाने अचानक घरी भेट दिल्याने ते इतरत्र फिरताना निदर्शनास आले. सध्या त्यांच्यात कोणत्याही प्रकारची कोरोना व्हायरस ची लक्षणे दिसली नसली तरी होम क्वारंटाईनचे शिक्के असताना सार्वजनिक स्थानी जाणे आणि मा. जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी चे आदेश असताना देखील हे बिनदिक्कतपणे इतरत्र फिरत होते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. यापूर्वी देखील श्रीवर्धन तालुक्यातील खारशेत भावे येथील परदेशातुन परतलेल्या तिघांवर क्वारंटाईनचे शिक्के असताना इतरत्र फिरत असल्याने गुन्हे दाखल केलेलं.
कोरोना संशयित क्वारन्टाईन करण्याऱ्याना घराबाहेर पडू न देण्यासाठी खबरदारीचा उपाय परदेशातून तसेच मुंबई व पुणे येथून अलेल्यांच्या हातावर विलगीकरण अर्थात होम क्वारंटाईनचे शिक्के मारलेले. साधारणपणे 15 दिवस त्यांनी घरात राहणे अपेक्षित होते. आदेश उल्लंघन प्रकरणी दिघी सागरी पोलीस ठण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी कलम 188 व 269 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
रवानगी इन्स्टिट्युशनल क्वारन्टाईन ला -
क्वारन्टाईन करून घरात ना राहणाऱ्या या तिघांना श्रीवर्धन मधील आराठी येथील ' इन्स्टिट्युशनल क्वारन्टाईन' येथे ठेवण्यात आले आहे. आता तिथेच त्यांना 15 दिवस काढावे लागणार आहे.
Post a Comment