टीम म्हसळा लाईव्ह
खरसई ग्रामपंचायत हद्दीतील गरजूंना म्हसळा तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच पत्रकार निकेश कोकचा, सामाजिक कार्यकर्ते मुसद्दीक इनामदार यांच्या स्व खर्चातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.गावातील अत्यंत गरजू ३० लोकांचा किट चे वाटप करण्यात आले या किट मध्ये तांदूळ,तेल, कडधान्य,मसाला,डाळी ई पदार्थांचा समावेश होता.
यावेळी उपविभाग अधिकारी अमित शेंडगे, नायब तहसीलदार के. टी. भिंगारे, सरपंच खरसई निलेश मांदाडकर, मंडळ अधिकारी दत्ता कर्चे, पत्रकार निकेश कोकचा, मुसद्दीक इनामदार, तलाठी गजानन गीऱ्हे, माने, के. एन. पाटील, अध्यक्ष- खरसई आगरी समाज पांडुरंग जी खोत , हेमंत पयेर , जनार्दन पयेर, तुकाराम मांदाडकर, सहदेव म्हात्रे, जगदीश खोत,
दिपाली कांबळे,भास्कर कांबळे उपस्थित होते.
शासनाने COVID-19 संबंधित दिलेल्या निर्देशांच्या आधारे सामाजिक अंतराचे पालन करून काळजीपूर्वक हा छोटेखानी कार्यक्रम पार पाडण्यात आला असून लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
Post a Comment