संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
जगभरात करोना विषाणू संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. इटलीनंतर आता अमेरिकेत करोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. पृथ्वीच्या पटलावर एकही देश नाही, जेथे करोना बाधित नाहीत. जागतिक स्तरावर लाखों करोना बाधित रुग्ण असून, मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या हजारोंच्या घरात गेली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक करोना बाधित आहेत. २२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू व टाळी आणि थाळी नादाचे आवाहन केले होते. देशवासीयांनी या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला होता. यानंतर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. देशवासी आपापल्यापरिने याला प्रतिसाद देत आहेत. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी रेल्वेसेवाही बंद करण्यात आली आहे. करोनाचे संकट गहिरे होत असताना त्यातून सकारात्मकता मिळावी, यासाठी पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा देशवासीयांना साद घातली दिप लावायची आज रविवार, ५ एप्रिल २०२० रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी म्हसळा करानी घरातील सर्व लाइट्स बंद करुन घराच्या प्रवेशद्वाराजवळ, बालकनीमध्ये दीप प्रज्ज्वलन केले. यामध्ये मेणबत्ती, पणती/दिवा, टॉर्च, मोबाइलचा फ्लॅश या गोष्टीचा वापर करून शहराचे विविध भागात व तालुक्यांतील बहुतांश गावात दीपोत्सव साजरा केला .
तालुक्यातील आंबेत , रोहिणी,आडी महाड खाडी, भेकरेचा कोंड, खारगाव बू., पाभरे, निगडी, कांदळवाडा, खरसई, मेंदडी, रेवली, वरवटणे, गोंडघर, खारगाव खुर्द, कणघर, लेप, कोळे,नेवरूळ, जांभूळ, घूम,साळविंडे, मांदाटणे, ठाकरोली,कोळवट,केलटे,तोंडसुरे,घोणसे, खामगाव, कुडगाव, संदेरी, लीपणी वावे, चिखलप,तोराडी,पांगळोली( कोंड) वारळ, फळसप, तुरुंबाडी, काळसूरी, देवघर या या गावांतून बहुतांश नागरीकानी आपल्या घराच्या पडवीत, अंगणात दिप प्रज्वलन केले.
Post a Comment