तळा शहरात कोरोना पार्श्वभूमीवर महसूल, नगरपंचायत, व पोलीस प्रशासनाची पहाणी.



तळा(किशोर पितळे)
संपूर्ण देशात लाँकडाऊन व संचारबंदी असून तळा शहरात सकाळी ११ते २ या वेळात जीवनावश्यक मालाची विक्री करण्यासाठी दुकाने उघडली जात आहेत परंतु जनता या कोरोना संसर्गजन्य विषाणू रोगाबद्दल अजूनही गांभीर्याने घेत नाहीत प्रशासनअहोरात्र कोरोनासंक्रमणरोखण्यासाठी सर्व यंत्रणा युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे.किराणा दुकान, भाजी दुकान, किरकोळ कांदाबटाटी दुकानदार यांच्या समोर मोठ्या प्रमाणावर दाटी वाटीने गर्दी करताना दिसत आहेत प्रशासनाला पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य करीत नाही असे चित्र पहायला मिळते यावेळी तहसीलदार कनशेट्टी, नगरपंचायतीच्या सिईओ. मडके मँडम,पोलीस निरीक्षक गेंगजे साहेब, मंडल अधिकारी गावणकर,सहकारी कर्मचारी वर्ग व पोलीस यांनी प्रत्यक्ष येऊन पहाणी केली दुकानदार व जनता सोशल डिस्टंट पाळत नाहीत.जवळ जवळ कांदे बटाटी दुकाने थाटल्याने गर्दी होती सरकारी यंत्रणेचा ताण वाढत आहे.कोरोना हटवायचे असेल तर प्रशासनास सहकार्य अपेक्षितआहे.वारंवार सांगून ही आपण काळजी घेत नसाल तर बाजारपेठ नाईलाजाने बंद ठेवावी लागेल.याबाबतीत सुचनाकेल्या.जरआपण सुचनांचे पालन न केल्यास आपणावर कारवाई करावी लागेल कायदा हातात घेण्याची वेळ येऊदेवूनका.अशी जख्खड ताकीद दिली मात्र रेशन दुकान व बँकेच्या सोशल डिस्टंट वर समाधान व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा