सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानचे माध्यमातून स्थानिक गरजु आणि स्थलांतरित असलेल्यांना अन्नधान्याचे वाटप सुरू.

म्हसळा-वार्ताहर
देशात आणि राज्यात कोव्हीड-19 विषाणूचा प्रादुर्भावावर मात करण्यासाठी महाराष्ट्रात गेले महिनाभर लॉकडाऊन असल्याने आणि 3 मे पर्यंत लॉककडाऊन वाढ झाल्याने आता जनतेला मोठया समस्यांना सामना करावा लागत आहे.लोकांचा रोजगारच बंद पडल्याने रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील गरीब गरजु आणि मुंबई,ठाणे,पुणे आदी महत्वाचे शहरात स्थलांतरित असलेल्या रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील गोरगरिब नागरिकांची आर्थिक परिस्थितीही बिकट झाली आहे या करिता थोडी अधिक का होईना मा.खासदार सुनिल तटकरे,नामदार आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांनी अन्नधान्य देवुन मदतीचा हात पुढे केला आहे.रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील गरजू तसेच ग्रामीण व शहरी भागांतून स्थलांतरित झालेल्या नागरिकांना सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अन्नधान्यांच्या पाकिटांचे वाटपास सुरवात केली आहे.आतापर्यंत जवळपास ५८०० पाकिटांचे वाटप केले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड,मंडणगड,दापोली तर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन,म्हसळा,तळा, माणगाव,रोहा,सुधागड,पेण तालुका तसेच स्थानिक पातळीवर प्राथमिक टप्प्यात अन्नधान्याची पाकिटे वाटप करण्यात आले आहेत.पुढील टप्प्यात जिल्ह्यातील इतर तालुक्यांत तसेच मुंबईकर चाकरमान्यांपर्यंत जवळपास ३५००० आणखी पाकिटांचे वाटप करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानचे प्रमुखांनी माहिती देताना सांगितले.


या अडचणीच्या काळात आम्ही सर्व मार्गांनी आपल्यापर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.त्यामुळे आपण घरातच थांबून करोनाच्या संकटासोबत लढा द्यावा.शासनाच्या सूचनांचे पालन करून या लढ्यात आपले योगदान द्या असे आमदार अनिकेत तटकरे सातत्याने कार्यकर्त्यां मार्फत मोबाईल कॉल,वॉटसाप,फेसबुकचे माद्यमातुन ट्वीट करून जनतेकडे सवांद साधत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा