संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यात आज सकाळपासून आकाश ढगाळ होते , आज दुपारचे तपमान ३६ अंश सें. होते .सायंकाळी ५च्या दरम्यान प्रथम मेघगर्जना व पावसाचा शिडकाव झाला. तालुक्यातील संदेरी, लीपणी वावे, तोराडी, पांगळोली, फळसप, या भागात गारपीटीसह सुमारे अर्धा तास पाऊस पडल्याचे आंबेत चे तलाठी जितेंद्र शेळके यानी सांगितले.सायं ६.३० पर्यंत ढगांची गडगडाट सुरुच होती व संधी प्रकाश पडला होता. आंबेत ,संदेरी परिसरांतीत लहान थोर मंडळी " पाऊस येऊ दे गारा पडूदे पण कोरोना जाऊ दे" असे म्हणत नाचत होती.
"आंबेत खाडी पट्टा परिसरांतीत २०/३० % आंबा काढणी लायक झाला आहे.कोरोना विषाणू (COVID-१९)च्या पार्श्वभूमीवर पुणे व वाशी येथील मार्केट यार्ड बंद आसल्याने आंबा काढणी केली नाही, वादळी वारा, व गारपीटी मुळे आंब्याची गळ मोठया प्रमाणात झाली"
नावीदभाई अंतुले, आंबा बागायतदार, आंबेत.
Post a Comment