तळा (किशोर पितळे)
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहेत या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन सोशल डिस्टन्स(सामाजिक अंतर)हा सद्यस्थितीत एकमेव उपाय म्हणून ही राबवलेली संकल्पनातळाबाजारपेठत धुळीला मिळाली आहे.किराणा स्टोअर,भाजी विक्रेते, दुध विक्रेते यांच्याकडे सोशल डीस्टन्सींगच्या खुणा करण्यात आल्या मात्र तालुक्यात या सोशल डीस्टन्सींगचा फार फज्जा उडाला आहे.कठोरकारवाई होत नसल्याने नियम पायदळी तुडवले जात आहेत. बाजारपेठेतील गर्दीने नियम फाट्यावर मारली आहे.
तालुक्यात र्सुदैवाने कोरोना बाधित रुग्णआढलेला नाही.हजारोंच्या संख्येने मुंबईकर गावाकडे आले आहेत. त्यांच्या हातावर स्टँप मारुन अलगीकरण केले आहे आरोग्य यंत्रणा सतर्कतेने काम करीत आहे तहसीलदार, पोलीस निरीक्षक जातीने लक्ष घालत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने लोकांची काळजी घेत जात असली तरी लोकांच्या अतिउत्साही,बेजवाबदारपणा व बेपर्वाईमुळे सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी तीन फुटांचे(एक मीटर)अंतर असणे गरजेचे आहे सध्या लाॅक डाऊन असले तरी दैनंदिन गरजा भागवण्यासाठी लागणाऱ्या वस्तुंचा पुरवठा होत आहे.तरीही बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी उसळत आहे.भाजीपाला खरेदी करताना कोरोना संसर्गाचे भान राहत नाही.ग्राहक सरळ गर्दीत घुसत आहेत.एकत्र गर्दी जमवत आहेत त्यामुळे कोरोना संसर्ग होण्याचा प्रचंड धोका वाढला आहे.
दुकानदारांनी ठिकठिकाणी ग्राहकांसाठी रंगाच्या सहाय्याने गोल आखण्यात आले.सुरवातीला या गोलातुन उभे राहुन काही जणांनी खरेदी केली,मात्र त्यानंतर ही व्यवस्था नागरीकांनी मोडीत काढण्यात आलीआहे असे वाटते तहसीलदार आणि पोलीस प्रशासन यांनी नियम पाळणार नसाल तर दुकान बंद करण्यात येईल अशा सुचना देऊन सुध्दा काही दुकानदार व्यापारी सोशल डीस्टन्सींग ही संकल्पना गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र तालुक्यात आहे.मात्र रेशनिंग दुकानासमोर शिस्तबद्ध सोशल डिस्टंट पहायला मिळते. दिल्ली ते गल्ली पर्यंत प्रशासन कानी कपाळी ओरडून या रोगाची मोठ्या प्रमाणावर जनजागृती करूनही नागरीक गांभीर्याने घेत नाहीत. तालुक्यात कोरोना संसर्ग सध्या तरी नियंत्रणात असुन ईतर तालुक्यांच्या मानाने तळा तालुक्यात आशादायी परिस्थिती आहे.ही परिस्थिती बदलुन आणखीन नियंत्रणात आणायची असेल तर प्रशासनाने कठोरात कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे.गर्दीचे नियोजन करावे,अशी मागणी सुज्ञ नागरिकांतुन होत आहे.
Post a Comment