प्रतींनिधी म्हसळा लाईव्ह
निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा महाराज यांचे मार्गदर्शनाने संत निरंकारी मंडळातर्फे कोरोना विषाणूमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनने प्रभावित झालेल्या जिल्ह्यातील १ हजार १३९ गरजू कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले . देशभर लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर हातावर पोट असलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे . अशा लोकांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्यासाठी मिशनचे स्वयंसेवक पुढे सरसावले आणि त्यांनी घरोघरी जाऊन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यास सुरुवात केली . जिल्ह्यातील खरसई येथे ११०, वडवली ७० , श्रीवर्धन ३० , माणगाव ३७ , कडापे ६२ , खरवली ११० महाड २०५ , रोहा ५० , कोंडगाव ३५ , बोर्वे ३५ , पेण १२५ , अलिबाग ३२ , सारळ २२ , पोयनाड ४ , भिलजी ३२ , खोपोली ५० , मार्केवाडी ८० तर सावरोली येथे ५० अशा एकूण हजार १३९ गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले . या जीवनावश्यक वस्तूंमध्ये लॉकडाऊन कालावधीत पुरेल इतके तांदुळ , गव्हाचे पीठ , डाळ मीठ , साखर , तेल , मसाला , बिस्कीटे चहा अशा विविध वस्तूंचा समावेश होता . तर मंडळाच्या वतीने पंतप्रधान साहाय्यता निधीमध्ये ५ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य , तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री रु . ५० लाख इतके अर्थसहाय्य दिलेले आहे . सद्गुरु माताजींनी सांगितले सेवा करताना सर्वांनी आरोग्य विभाग आणि प्रशासनाकडून दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे मंडळाने या संकटमय परिस्थितीत देशाबरोबर उभे राहण्याची प्रतिज्ञा केलेली असून हे संकट लवकरात लवकर दूर व्हावे म्हणून मंडळाच्या वतीने प्रार्थनाही करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले . .
Post a Comment