प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
शासनाने करोना विषाणूचा (COVID-19) प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897,दि.13 मार्च 2020 लागू करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील समुद्र किनारी (Sea Beaches) तसेच किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणावर नागरिक पर्यटनासाठी येत असतात. यामुळे या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन त्याद्वारे करोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने ही गर्दी टाळून विषाणू संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्व समुद्र किनारी (Sea Beaches) व सर्व किल्ल्यांवर पर्यटकांनी जाण्यासाठी दि. 31 मार्च 2020 पर्यंत बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले होते.
मात्र आता लॉकडाऊनचा कालावधी दि.3 मे पर्यंत वाढविण्यात आल्याने जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारी (Sea Beaches) व किल्ल्यांवर पर्यटकांनी जाण्यास दि.03 मे 2020 पर्यंत बंदी आदेश जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी दिले आहेत.
या आदेशानुसार कार्यवाही न करणाऱ्या व्यक्ती,नागरिक वा आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्ती,नागरिक यांच्याविरुध्द भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे.
Post a Comment