तळा नगरपंचायती मार्फत जंतुनाशक फवारणी युद्धपातळीवर ; कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्नशील.


तळा (किशोर पितळे)
राज्यात कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानामुळे ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढू नये यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याच पाश्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून तळा नगरपंचायतीकडून दररोज संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी नगरपंचायतीकडून नागरिकांना तोंडाला रुमाल बांधा, बाहेरून आल्यावर आपले हात साबणाने स्वच्छ धुवा,स्वतःच स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या घराबाहेर पडू नये. बाजारात सुरक्षित अंतर ठेवा.असे जनजागृतीचे आवाहन स्पीकरद्वारे करण्यात येत आहे. तसेच दररोज शहरातील बळीचा नाका,रोहिदास वाडी,कुंभारवाडी,जोगवाडी, परीटवाडी, राणेची वाडी, कासार आळी, सोनारआळी, भोईर वाडी, फोंडल वाडी, मुंढ्याची वाडी,बामणघर  पुसाटीवाडी या वार्डामधून  परसदारी, गटारे, रस्ते, झाडे झुडपे इत्यादी ठिकाणी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून कोरोना प्रतिबंधक फवारणी केली जात आहे.त्यासाठी लागणारा पुरेसा जंतुनाशक औषधे साठा नगरपंचायत कार्यालयात उपलब्ध झाला असून १५ एप्रिल पर्यंत पुरेल एवढा साठा उपलब्ध असून नगरपंचायत प्रशासन कोरोना नियंत्रण ठेवण्यासाठी सज्ज आहे तसेच सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याची माहिती मुख्याधिकारी माधुरी मडके आणि नगराध्यक्षा रेश्मा मुंढे यांनी दिली. 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा