संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा शहराच्यI मध्यवर्ती ठीकाणी दिव्या माहिला बचतगटा रवारगाव (बु )च्या माध्यमातून शिव भोजन थाळीची सुरवात नुकतीच झाली. दिधी नाक्यावरील बनकर-परबळकर कॉम्लेक्स मध्ये सुरु केलेली ही योजना अतीशय मध्यवर्ती जागेत सुरु होत आसल्याने आमच्या हातून खऱ्या अर्थाने सेवा होणार असल्याचे संचालक श्रीमती सुधिता भालचंद्र नाक्ती यानी सांगितले.दिव्या माहिला बचतगटाच्या या व्यवसायाता शिवसेना तालुका प्रमुख महादेव पाटील, शहर प्रमुख अनिकेत पानसरे, पत्रकार निकेश कोकचा, सुशिल यादव, अनिल काप, सुरेश कुडेकर, मयुर बनकर, दत्ता सुतार.मनोहर तांबे, आदीनी शुभेच्छा दिल्या.दुपारी 12 ते 3 या वेळात किमान ७५ गरजुंना दोन चपात्या , एक वाटी वरण , भाजी व भात शिवभोजन थाळीत उपलब्ध आहे असे यावेळी सांगण्यात आले.
"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सर्वात आवडती योजना म्हणजे शिवभोजन थाळी. ज्यांच्याकडे स्वत:चे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, बेघर आणि अनेक ठिकाणी विमनस्क अवस्थेत असणाऱ्या नागरिकांना रोजच्या दोन वेळच्या जेवणाची सुविधा शिव भोजन योजनेने उपलब्ध केली आहे "
महादेव पाटील ता. प्रमुख शिवसेना म्हसळा
Post a Comment