प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
संपूर्णजगात कोरोनाविषाणूजन्य संसर्ग रोगाने हाहाःकार माजवला असुन या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रधानमंत्री मंत्री मा.नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे यांना सर्व स्तरावर उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे .संपूर्ण देशात लाँक डाऊन केले असून संचार बंदी घातलीआहे. सर्वजण घरात आहेत त्यामुळे सर्व बाजारपेठा, औद्योगिक कारखाने, कार्यालये बंद असल्याने सामान्य माणसाच्या जीवनाश्यक वस्तू खरेदी करता येत नाहीत.त्यामुळे सर्व सामान्य नागरिक मोलमजुरी करणाऱ्याचे हाल झाले आहेत.
अश्याच कठीण परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी अनेक संस्था पुढे आल्या आहेत आणि शासनाने COVID-19 बाबत दिलेल्या निर्देशांच्या अधीन राहून उपक्रम राबवून ग्रामीण भागात लोकांना सहकार्य करीत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर खरसई संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या रायगड झोन 40 (A) च्या अंतर्गत म्हसळा तालुक्यातील खरसई ब्रँच च्या वतीने ता. 2 एप्रिल रोजी खरसईतील गावातील 50 कुटुंबीयांना तांदूळ, कांदे, बटाटे, तेल तसेच चवळी, मूग व वाटाणा अशा जीवनावश्यक खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमास म्हसळा तालुक्याचे उपविभाग अधिकारी ( प्रांत ) मा. श्री. अमित जी शेंडगे, नायब तहसीलदार ( म्हसळा तालुका ) मा. श्री. के. टी. भिंगारे, मंडळ अधिकारी श्री. दत्ता कर्चे, झोन प्रमुख प्रकाश म्हात्रे गुरुजी, पत्रकार निकेश कोकचा, श्री. गजानन गीऱ्हे ( तलाठी - मेंडदी ), श्री. माने ( तलाठी- वारळ ), श्री. के. एन. पाटील ( तलाठी - म्हसळा ), निलेश जी मांदाडकर ( सरपंच - खरसई ग्रामपंचायत ), पांडुरंग जी खोत ( अध्यक्ष- खरसई आगरी समाज ), रायगड भूषण श्री. हेमंत भाऊ पयेर, ग्रामसेव जाधव, युनिट 895 चे सेवादल संचालक तुकाराम जी मांदाडकर, सह.शिक्षक सहदेव जी म्हात्रे, तसेच जनार्दन जी पयेर, आदी मान्यवर उपस्थित होते. शासनाने COVID-19 बाबत दिलेल्या निर्देशांच्या अधीन राहून हा कार्यक्रम घेण्यात आला.
Post a Comment