संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. पण, त्यानंतर देखील रस्त्यावर वाहनांची रहदारी कमी झाली नाही.परिणामी रायगड जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण क्षेत्रात दि. २९ मार्चपासून अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त वाहनांना बंदी करण्यात आली. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्यांना यातून मुभा आहे. तर अति महत्त्वाच्या कामासाठी नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने पास दिले या सर्वावर म्हसळा शहरांत पोलीसानी कारवाई करुनही बाजारांत वाहनांची वर्दळ ,मेडीकल,किराणा, दूध व भाजीपाला खरेदीच्या नावाखाली वर्दळ प्रचंड वाढल्याने व सोशल डीस्टंसचा नियम व्यापारी व ग्राहक तोडू लागले. यावर महसूल, पोलीस व नगरपंचायत प्रशासनान म्हसळा यानी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनी.दि.४ एप्रिल ते सोमवार दि.६ एप्रिल पर्यंत तीन दिवस संचार बंदी जाहीर केली आहे.या कालावधीत मेडीकल, रास्तभाव धान्य दुकाने व दूध विक्री ( फक्त सकाळी ७ते स.९या कालावधीत) ही अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी ठेवण्याची प्रशासनाने सवलत दिली आहे. या तीन दिवसांत योग्य कारणाशिवाय नागरिक घराबाहेर आल्यास प्रशासना मार्फत कारवाई करण्यात येणार आसल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.यापुढे कोणीही नागरीक शहरातुन दुचाकी वाहनांवर अनावश्यक फिरतांना मिळून आल्यास पोलीस प्रशासनातर्फे सदरचे वाहन जप्त करून वाहनांवरील सर्व व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
"विना कारण गर्दी करुन, फेरफटका मारताना व अत्यावश्यक सेवा नसतांना दुध विक्रीच्या निमित्ताने दुकान ,मॉल उघडे ठेवणे व दुधाच्या नावाखाली अन्य वस्तूची विक्री करणे अश्या प्रकारे संचारबंदीचे आदेश न पाळणाऱ्या व्यापारी, ग्राहक लोकांवर भादंविक.१८८ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येतील"
धनंजय पोरे, स.पो.नी. म्हसळा.
Post a Comment