प्रतिनिधि म्हसळा लाईव्ह
जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी ज्या तालुक्यांमध्ये पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती आहे, अशा तालुक्यातील गावे, वाड्यांना जिल्हा प्रशासनाकडून टँकर्स, बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा केला जात असून त्याची माहिती पुढीलप्रमाणे-
पेण तालुक्यातील 10 गावे,74 वाड्या-एकूण 84 गाव/वाड्यांमधील एकूण 22 हजार 586 नागरिकांना 7 खाजगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
रोहा तालुक्यातील 4 गावे, 2 वाड्या-एकूण 6 गाव/वाड्यांमधील एकूण 2 हजार 896 नागरिकांना सामाजिक संस्थेच्या मदतीच्या एका टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
महाड तालुक्यातील 5 गावे,37 वाड्या-एकूण 42 गाव/वाड्यांमधील एकूण 2 हजार 365 नागरिकांना 4 खाजगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पोलादपूर तालुक्यातील 14 गावे,35 वाड्या एकूण 49 गाव/वाड्यांमधील एकूण 1 हजार 590 नागरिकांना 5 खाजगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
अशा प्रकारे संपूर्ण जिल्ह्यातील एकूण तालुक्यांपैकी पेण,रोहा,महाड,पोलादपूर या चार तालुक्यांमधील एकूण 33 गावे, 148 वाड्या असे मिळून एकूण 181 गाव/वाड्यांमधील एकूण 29 हजार 437 नागरिकांना 16 खाजगी, सामाजिक संस्थेच्या मदतीने एक असे 17 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड सर्जेराव मस्के-पाटील यांनी दिली आहे.
Post a Comment