"कोरोनाच्या पार्श्वभूमीवर" म्हसळा तालुक्यात गॅस वितरण व्यवस्था सुरळीत


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
संपूर्ण देशात व राज्यात कोरोनाने पाय पसरायला सुरुवात केली आहे.या पार्श्वभूमीवर नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने देशभरातील घरगुती वापराच्या विनाअनुदान गॅस सिलिंडरचे दर तब्बल ६१ रुपयांनी कमी केले आहे. आता १४.२ किलोचे गॅस सिलिंडर ८०५ रुपयांऐवजी ७४४ रुपयांना मिळणार आहे.कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग आर्थिक मंदीत सापडले आहे. अनेक देशांच्या चलनाच्या किमती घसरल्या आहेत. मंगळवारी नैसर्गिक गॅसच्या किमतीमध्ये तब्बल २६ टक्के कपात करण्यात आली.राज्यात काही भागात गॉस पुरवठा बाबतीत अनियमित पणा होत असल्याच्या घटना होत असतानाच तालुक्यात तीन एजन्सीच्या माध्यमातून वितरण . व्यवस्था पारदर्शक आसल्याचे सांगण्यात आले. तालुक्यात १५६६५ गॅस धारक आहेत ,म्हसळा शहर व परिसरांत कादरी . गॅस एजन्सी ९१९८, गद्रे गॅस एजन्सी दिवेआगर ५१५७ व (आंबेत) राजेश गॅस एजन्सी १३१० गॉस ग्राहक आहेत. तीनही एजन्सीच्या माध्यमातून वितरण व्यवस्था सुरळीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा