संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन वडवली तर्फे वडवली मध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.


प्रतिनिधी  म्हसळा लाईव्ह
संपूर्णजगात कोरोनाविषाणूजन्य संसर्ग रोगाने हाहाःकार माजवला असुन या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रधानमंत्री मंत्री मा.नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे त्याला सर्व स्तरावर उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे .संपूर्ण देशात लाँक डाऊन केले असून संचार बंदी घातलीआहे. सर्वजण घरात आहेत त्यामुळे सर्व बाजारपेठा, औद्योगिक कारखाने, कार्यालये बंद असल्याने सामान्य माणसाच्या जीवनाश्यक वस्तू खरेदी करता येत नाहीत.त्यामुळे सर्व सामान्य नागरिक मोलमजुरी करणाऱ्याचे हाल झाले आहेत. 
अश्याच कठीण परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी अनेक संस्था पुढे आल्या आहेत आणि शासनाने COVID-19 बाबत दिलेल्या निर्देशांच्या अधीन राहून उपक्रम राबवून ग्रामीण भागात लोकांना सहकार्य करीत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर वडवली संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या रायगड झोन 40 (A) च्या अंतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील वडवली ब्रँच च्या वतीने आज ता. 1 एप्रिल रोजी वडवली गावातील 65 कुटुंबीयांना तांदूळ, कांदे, बटाटे, तेल तसेच चवळी, मूग व वाटाणा अशा जीवनावश्यक खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले.  यावेळी झोन   प्रमुख प्रकाश म्हात्रे गुरुजी यांची उपस्थिती होती. शासनाने COVID-19 बाबत दिलेल्या निर्देशांच्या अधीन राहून  हा छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा