संजय खांबेटे : म्हसळा प्रातिनिधी
कोविड-19 या आजाराच्या प्रतिबंधाकरिता केंद्र व राज्य शासना कडून करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एच.आय. व्ही संसर्गितांच्या औषधांमध्ये खंड पडू नये, याची खबरदारी म्हणून राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था नवी दिल्ली व महाराष्ट्र एड्स नियंत्रण सोसायटी वडाळा, मुंबई यांच्या आदेशानुसार एआरटी केंद्र, जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग व धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, अलिबाग येथे एचआयव्ही संसर्गित असणाऱ्या व्यक्तीला देण्यात येणारी एआरटी उपचार पद्धती ही जवळील जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथील आयसीटीसी केंद्रामध्ये देण्यात यावे असे शासनाचे धोरण आहे. मात्र म्हसळा तालुक्यातील एचआयव्ही संसर्गित वाऱ्यावरच आसल्याचे दिसते याबाबत म्हसळा तालुक्यातील संसर्गितानी कुठून उपचार घ्यावेत याची स्पष्ट माहीती तालुका महसुल विभाग अथवा तालुका आरोग्य अधिकाऱ्यानी अनभिज्ञ आसल्याचे सांगितले.जिल्हयांतील अन्य १३ तालुक्यांतील संसर्गितानी आपली औषधे सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथील आयसीटीसी केंद्रामध्ये घ्यावी असे असताना श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील ऋग्णांचे काय ? अशी परीस्थीती सध्या आहे.
" सदरची औषधे सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथील आयसीटीसी केंद्रामध्ये उपलब्ध होतात तशीच ती आता संर्सगीतांपर्यंत ( घरपोच )उपलब्ध व्हावी असे पुढे येत आहे."
"लॉक डाऊनच्या परीस्थीतीत म्हसळा तालुक्यातील एका संसर्गिताने म्हसळा वरून प्रथम पनवेल, तिथून अलिबाग येथे खाजगी गाडीने जाऊन आपली औषधे घेतली संसर्गिताना घरपोच औषध देयची असून त्याला झालेला मानसीक, आर्थिक बुर्दंडाला जबाबदार कोण"
"म्हसळा तालुका ग्रामिण रुग्णालयाला आवश्यक असणारा अधिक्षक हा कायम स्वरुपी नसल्यामुळे सातत्याने आरोग्य विषयक समस्या ऐरणीवर येत असतात, ग्रामिण रुग्णालयाला कायमस्वरूपी वैद्यकिय अधिक्षक असावा"
महादेव पाटील, तालुका प्रमुख शिवसेना , म्हसळा.
" म्हसळ्यातील संसर्गिताना औषधे कुठे मिळणार या बाबतची माहीती माझ्याकडे उपलब्ध नाही."
डॉ. गणेश कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी, म्हसळा.
" लॉक डाऊनच्या काळांत संसर्गिताना उप- जिल्हा रुग्णालय रोहा येथे एआरटी उपचार पद्धतीची औषधे मिळू शकतील"
डॉ.पवन, वैद्यकिय अधिकारी ग्रामिण रुग्णालय , म्हसळा.
Post a Comment