लॉकडाऊन कालावधी वाढविल्याने जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था 3 मे पर्यंत बंद

प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह 
शासनाने करोना विषाणूचा (COVID-19) प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897,दि.13 मार्च 2020 लागू केला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका,सर्व नगरपालिका व सर्व नगर पंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी-खाजगी शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्था, महानगरपालिका/नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्राच्या परिघाबाहेर ग्रामीण क्षेत्रात मोडणाऱ्या परंतु नागरी क्षेत्राला लागून असलेल्या शैक्षणिक संस्था, शैक्षणिक संस्थांमधील निवासी विद्यार्थी वसतिगृहे दि.31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याबात जिल्हा प्रशासनाने आदेश जारी केले होते.
मात्र आता लॉकडाऊनचा कालावधी दि.3 मे पर्यंत वाढविण्यात आल्याने जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका व नगर पंचायत क्षेत्रातील सरकारी-खाजगी शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्था, महानगरपालिका/नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्राच्या परिघाबाहेर ग्रामीण क्षेत्रात मोडणाऱ्या परंतु नागरी क्षेत्राला लागून असलेल्या शैक्षणिक संस्था, शैक्षणिक संस्थांमधील निवासी विद्यार्थी वसतिगृहे दि. 03 मे 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी दिले आहेत.
या आदेशानुसार कार्यवाही न करणाऱ्या व्यक्ती,नागरिक वा आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्ती,नागरिक यांच्याविरुध्द भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा