तळा (किशोर पितळे)
संपूर्ण जगासह देशात कोरोनाने थैमान घातलेअसल्याने प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश लाँकडाऊन करून संचारबंदी लादली आहे या कोरोनाला हरवायचे असेल तर स्वतः स्वताःचे रक्षक व्हा आणी घरातच रहा.काळजी घ्या संसर्गाची भीती नाही.सोशल डिस्टंट पाळणे असे जागतिक आरोग्य संस्था यांनी काढलेल्या निष्कर्षाची अंमलबजावणी करण्यातआली आहे.याचा उपयोग शेतकऱ्यांनी शेतीच्या कामासाठी करावा त्यामुळे विनाकारण बाजारात फिरणे टाळता येईल, खर्चात बचतहोते,संसर्ग नाही,प्रवासबंदी शेतीकामासाठी माणसेउपलब्धआहेत.एकमेकांच्या(परटेल) कामावर गेल्याने मजूरी देणे बंद,पैशाची बचत,दोन वेळच्या जेवणाची बचत,कामाचा लवकर निपटारा,महत्त्वाचे म्हणजे वेळेचा सदुपयोग शेती कामासाठी अधिक केल्यास घरात बसून येणाऱ्या कंटाळ्यावर मात अशा प्रकारे परिस्थितीचा फायदा बळीराजाने घेतला तर निश्चितच पावसाळी शेती ओसाड जाणार नाही.वेळे
पुर्वी मशागत पुर्ण होऊ शकते शासनाने या रोगाचे संक्रमण रोखण्यासाठी कठोर निर्णय घेतले आहेत त्या प्रमाणे शेतकऱ्यांना विनंती आहे की शेतावर काम करताना मास्क बांधणे,जास्त संपर्कात न येता काळजी घेतली तर कामे होऊ शकतात.असा या कोरोना पार्श्वभूमीवर तमाम शेतकरी बांधवांना सुचित करावेसे वाटते.
Post a Comment