पत्रकार उमेश घोले "संवेदना प्रेरणा" पुरस्काराने सन्मानित


म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
   रायगड जिल्ह्यामधील शिलीम गावातील गवळी समाजाचे सुपुत्र, सामान्य जनतेचे प्रश्न अगदी निर्भीडपणे विविध वृत्तपत्रा मध्ये मांडणारे पत्रकार उमेश रामचंद्र घोले यांना जेष्ठ समाजसेवक श्री.राहुल दळवी यांच्या हस्ते पत्रकारिता क्षेत्रात काम करीत असतानाच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात चौफेर कार्य-कर्तृत्वाची उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल संवेदना फाऊंडेशन व माईंडफुलनेस एज्युकेशन यांच्या तर्फे २०२० चा राज्यस्तरीय "संवेदना प्रेरणा पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार वितरण सोहळा दि.२९ फेब्रुवारी २०२० रोजी ठाणे येथील डॉ.काशिनाथ घाणेकर या सभागृहात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
सामाजिक कार्याची दखल घेत यापूर्वीही उमेश घोले यांना वेगवेगळ्या संस्था, सामाजिक संघटना यांनी पत्रकार उत्कर्ष समिती तर्फे आदर्श पत्रकार पुरस्कार, बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार, अचूकवार्ता संपादकीय पुरस्कार असे विविध पुरस्कार देऊन गौरविले आहे. पुरस्कार प्राप्त उमेश घोले यांचे सर्व स्तरातून अनेक मान्यवर, राजकीय, शासकीय अधिकारी, नातेवाईक मित्रपरिवार यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा