केंद्राप्रमाणे राज्यातील शासकीय कार्यालयांनाही कामकाजाचा पाच दिवसांचा आठवडा : म्हसळा बाजारपेठेवर मंदीचे सावट.

केंद्राप्रमाणे राज्यातील शासकीय कार्यालयांनाही कामकाजाचा पाच दिवसांचा आठवडा : पहील्याच दिवशी म्हसळा बाजारपेठेवर मंदीचे सावट.

संजय खांबेटे : म्हसळा

आज पासून केंद्राप्रमाणे राज्यातील शासकीय कार्यालयांना प्रत्येक महिन्यातील सर्व शनिवारी व रविवारी सुट्टी राहणार आहे. आज २९ फेबु पासून सुट्टीची पहिली सुरवात झाली. शासकीय कार्यालयांच्या सुट्टीची झळ अधीच मंदीत आसलेल्या म्हसळा बाजारपेठेवर झाली आसल्याचे प्रथम दर्शनी दिसते. तसाच थोडा बहुत परीणाम S.T .(राज्य मार्ग परिवहन) वर सुध्दा झाला आहे.तालुक्यातील महत्वाचे शासकीय कार्यालयांचा पाच दिवसाचा आठवडा .झाल्याने कार्यालयीन कामकाजाचे निमित्ताने शहरात आलेले नागरीक मोठया प्रमाणात बाजार रहाट करीत असत. पण पाच दिवसाच्या आठवडयांमुळे शनीवार सुट्टी त्यामुळे बाजारांत ग्राहकांची कमतरता दिसली.
म्हसळा बाजारपेठ ही म्हसळा तालुक्यातील काही गावां सोबतच तळा, माणगाव व श्रीवर्धन तालुक्यातील ११५ छोट्या मोठया गावासाठी म्हसळा बाजार मध्यवर्ती आहे बाजार पेठेतील कापड ,सराफी, ओली- सुकी मच्छी व्यापार प्रसीध्द आहे. म्हसळा शहरांत कमी जास्त प्रमाणात ३०० ते ३५० व्यवसायीक आहेत. त्यामध्ये किराणा ३५,कापड १५, सराफी १० , वैद्यकिय व्यवसायीक १०, बिल्डींग मटेरीयल व हार्डवेअर ५, तांबे पितळ स्टील १०,हॉटेल२५, मेडीकल १२, मसाला व पिठ गिरणी ६, स्वीट मार्ट ५, इलेक्ट्रॉनिक व फर्नीचर १०, झेरॉक्स सेंटर १०, बेकरी१२, तंबाखू- सुपारी -सिगारेट ८ ते १०, कटलरी १५, मोबाईल शॉपी ३, भाजी व फळे विक्रेते ४०, मच्छी ओली व सुकी ४०, आईस्क्रीम सेंटर ५, चणा-शेंगदाणे ७, चायनीज सेंटर ८, वडापाव व स्नॅक सेंटर २५ आहेत या बहुतांश व्यवसायीकांवर थोडा बहुत परिणाम झाल्याची चर्चा बाजारात आहे.

"२९ फेब्रु महिन्यातील पाचवा शनी होता, पाच दिवसाच्या आठवडयाच्या सवलतीची सुरवातच असताना ई- सेवा केंद्रावर (सरकार सेवा केंद्र) ग्राहक फारच कमी प्रमाणात फिरकले हा पाच दिवसाच्या आठवडयाचा बाजारपेठेवरील परिणाम आहे"
सुजित सखाराम काते, काते इंटरप्रायझेस, म्हसळा

"गेले अनेक वर्षापासून म्हसळा शहरांतील कापड- किराणा व्यापारी असोसीएशनने ठरविल्या प्रमाणे बाजारपेठेतील दुकाने सोमवारी बंद( सुट्टीचा दिवस) असतो. शासकीय कार्यालयाना ५ दिवसाचा आठवडा झाल्याने दुकानदारांसाठी व्यापारा साठी ४ दिवस शिल्लक रहातात. भविष्यांत व्यापाऱ्यानी शनीवारी दुकाने बंद ठेवावी असा प्रस्ताव ठेवावा लागेल."
राहुलशेठ जैन , कापड व्यापारी.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा