श्रीवर्धन तालुक्यांतील साखरोणे येथिल जेष्ठ शिवसैनिक मारूती वामन विचारे यांचे दुःखद निधन.


मंगेश निंबरे श्रीवर्धन
श्रीवर्धन-दिं २० मार्च २०२० श्रीवर्धन तालुक्यांतील साखरोणे येथिल जेष्ठशिवसैनिक मारूती विचारे यांचे अल्पशा अजाराने दिं २०मार्च २०२० रोजी पहाटेच्या सुमारास निधन झाले. त्यांचे वय ६८ वर्षे होते त्यांच्या पाश्चात पत्नी चार मुली असा परीवार आहे. विचारे यांना दोन दिवसापूर्वी तबेतीचा त्रास होऊ लागल्याने श्रीवर्धन येथिल उपजिल्हा रूग्णालय येथे दाखल करण्यात आले होते प्रकृती गंभीर असल्यामुळे डॉक्टरानी पुढील उपचारा करीता अलिबाग येथे पाठविण्यात आले मात्र पहाटेच्या वेळेस विचारे यांचे निधन झाले.
     श्रीवर्धन तालुक्यांत मारूती विचारे हे निष्ठांवंत शिवसैनिक धडाडीचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती ते अन्याया विरोधात सतत लढत असत शिवसेनेच्या अनेक अंदोलन कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन त्यांची वकृत्वाची तोफ धडाधडत असे मात्र त्यांच्या अचानक निधनाने श्रीवर्धन तालुका शिवसेना संघटनेमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या निधनाने  तालुक्यांत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांचे अंत्यविधी संकार साखरोणे येथिल स्मशानभुमित करण्यात आले. श्रध्दांजलीच्यावेळी एक साधे सरळ व्यक्तीमत्व हरपले असून नेहमीच  अन्याया विरोधात लढणारी तोफ थंड झाली अशा शब्दांत उपस्थीतांनी श्रद्धांजलीं अर्पण करण्यात आली. यावेळी मा.आम तुकाराम सुर्वे, सुजित तांदळेकर, प्रतोष कोलथरकर, सुकुमार तोंडलेकर, अरूण शिगवण, सुरेश पाटील,सुरेश मांडवकर,राजू जाधव, बाबुराव चोरगे, हरीचंद्र मळेकर, गजानन कदम, कुमार पडवळ, गणपत सोलकर शरद महाडीक जगनाथ चाळके, नंदू भाटकर, कांबळे, संदेश म्हसकर,मनोहर सांवत, सुभाष मोरे, दिपक देवघरकर,संतोष कासरूंग पत्रकार मंगेश निंबरे,मनोज कालप,बबन जोशी, प्रमोद दुदुस्कर, श्री रामाणे, तालुक्यांतील अनेक मान्यवर कार्यकर्ते मोठया संखेने उपस्थीत होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा