दुर्गवाडी गावात विविध कार्यक्रम संपन्न
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुक्यातील नगरपंचायत हद्दीतील दुर्गवाडी गावात सालाबादप्रमाणे महिलांसाठी हळदी कुंकू, श्री सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक दिलीप कांबळे, म्हसळा शहर हिंदू समाज अध्यक्ष बालशेठ करडे, नगरसेवक संजय कर्णिक, नगरसेविका शितल मांडवकर यांसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मनोगत व्यक्त करताना सांगितले की ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक नोकरी, व्यवसाय, शिक्षण, यानिमित्ताने मुंबईत स्थलांतर झालेले आहेत. त्यामुळे सर्वत्र गाव, वाडीवस्त्या ओस पडलेले दिसतात. काही मोजक्याच सणानिमित्ताने मुंबईकर चाकरमनी गावाला येत असतात. ही मंडळी गावी आली की गावे गजबजलेल्या स्थितीत असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी कोणत्याही कामानिमित्त मुंबई किंवा इतर शहरात स्थलांतर केलेले असले तरी त्यांनी गावची आठवण मनात कायम जपून ठेवली पाहिजे असे महत्वपूर्ण प्रतिपादन दिलीप कांबळे यांनी यावेळी केले. तसेच दुर्गवाडी गावची सामाजिक बांधिलकी व एकी कौतुकास्पद असल्याचे सांगितले. उत्साहात व आनंददायी वातावरणात ग्रामस्थांनी, महिला, तरुण सर्वांनी एकाच कलरचा पोशाख, फेटे बांधून वाजत गाजत गावातून मिरवणूक काढून लहान थोरांनी वार्षिक उत्सवाचा आनंद लुटला असे मुंबई मंडळाचे अध्यक्ष सुभाष काप यांनी सांगितले. हळदी कुंकू कार्यक्रम साठी दुर्गवाडी गावासहित चिराठी, गवळवाडी, म्हसळा शहारतील महिला उपस्थित होत्या. यावेळी स्थानिक व मुंबई मंडळाचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार महिला मंडळ अध्यक्ष व इतर सर्व पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment